शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी आवर्तनावर भरारी पथकाची ‘नजर’

By admin | Updated: November 20, 2015 02:45 IST

नीरा डावा कालव्यातून १४ नोव्हेंबरपासून रब्बी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, अल्प पर्जन्यमानामुळे वीर, भाटघर धरणातील पाणीपातळी कमालीची घटली आहे.

बारामती : नीरा डावा कालव्यातून १४ नोव्हेंबरपासून रब्बी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, अल्प पर्जन्यमानामुळे वीर, भाटघर धरणातील पाणीपातळी कमालीची घटली आहे. यामुळे या आवर्तनाावर पाटबंधारे विभागाने कडक नियंत्रण ठेवण्याचे ठरविले असून भरारी पथकाची ‘नजर’ ठेवण्यात येणार आहे. जुलैै २०१६ अखेर पिण्यासाठी व मंजूर औद्योगिक वापरासाठी पाणी राखून नियोजन करण्यात आले आहे. पाणीचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर सुरुवातीपासून नजर ठेवण्यात येणार आहे. चोरून पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना सुरुवातीला समज देण्यात आली आहे. कालवा निरीक्षक, पाटकरी यांच्यामार्फत समज देण्यात आली आहे. गरज भासल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब भोसले, शाखाधिकारी शंकरराव चौलंग आदींचा भरारी पथकामध्ये समावेश आहे. कालव्यात पाणी सोडण्यापूर्वी भरारी पथकाने पाहणी करून सायफन काढले आहेत. पिण्याचे पाणी महिन्यातून तीन दिवस पोलीस बंदोबस्तात सोडण्यात येणार आहे. नीरा-डावा कालव्यावर बारामती शहरासह १० मोठ्या पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याचे पाटबंधारे खात्याचे उपविभागीय अधिकारी भोसले, शाखा अधिकारी चौलंग यांनी सांगितले.या आवर्तनानंतर १ एप्रिल २०१६ ला उन्हाळी आवर्तन देण्यात येणार आहे. मात्र, या आवर्तनाचा कालावधी उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून आहेत. (वार्ताहर)इंदापूरच्या २२ गावांंना लवकर पाणी द्या!वितरिका क्रमांक ४९, ५७, ५४ मोठ्या आहेत. त्यामुळे येथील क्षेत्र भिजण्यासदेखील वेळ जातो. परिणामी, या परिसरातून इंदापूर तालुक्यातील २२ गावांना नेहमी उशिरा पाणी मिळते. तोपर्यंत पिके जळून जातात. धरणात पाणीपातळी भरपूर आहे. ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा धरणात आहे. त्यामुळे २२ गावांतील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी द्यावे, अशी मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीचे नेते सूर्यकांत रणवरे यांनी केली आहे.