शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर रस्त्यांवरच्या उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: November 21, 2015 04:08 IST

घोरपडी व लुल्लानगरमधील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न त्यात थेट संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लक्ष घातल्यामुळे सुटण्याची चिन्हे आहेत.

पुणे: घोरपडी व लुल्लानगरमधील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न त्यात थेट संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लक्ष घातल्यामुळे सुटण्याची चिन्हे आहेत. पर्रिकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी व आज पालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात लष्कराच्या ताब्यातील रस्ता कामासाठी पालिकेकडे देण्याला पर्रिकर यांनी हिरवा कंदील दाखवला. खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, श्रीनिवास बोनाला, लष्कराचे भास्कर रेड्डी, के. जी. सिंग यादव आदी या बैठकीला उपस्थित होते. या दोन्ही उड्डाणपुलाखालील रस्ता लष्कराच्या ताब्यात असल्यामुळे पालिकेला तिथे काम करण्याबाबत अडचणी येत होत्या. स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांबरोबर वारंवार बैठका घेऊनही यातून मार्ग निघत नव्हता. पर्रीकर यांनी लुल्लानगर येथील रस्ता पालिकेला देण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी पालिकेने त्वरित सविस्तर प्रस्ताव तयार करावा व तो संबधित लष्करी कार्यालयाकडे सादर करावा, असे त्यांनी सांगितले. घोरपडी येथील उड्डाणपूल सिंगल पीलर सिस्टिमचा वापर करून केन्टिलिव्हर पद्धतीचा बांधवा. लष्कराच्या शाळेपासून पुढेपर्यंत हा पूल बांधावा, अशी सूचना पर्रीकर यांनी केली. दोन्ही पुलांबाबत लष्करातील अधिकाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करावे, पालिकेने कामांचे सविस्तर प्रस्ताव करून लष्करी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करावी व १५ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव लष्कराच्या संबधित कार्यालयाकडे सादर करावेत असे पर्रीकर यांनी सांगितले. या निर्णयामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उड्डाणपूल नसल्याने या भागातील काही रस्ते लष्कराने सुरक्षकेच्या कारणास्तव बंदही केले होते. उड्डाणपुलाचा प्रश्नही गेल्या अनेक वर्षापासून रखडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. यासाठी नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा आंदोलनेही केली होती. (प्रतिनिधी)