शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगरात फ्लॅग ऑफ सेरेमनी ऑफ सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:14 IST

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळावर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फ्लॅग ऑफ सेरेमनी ऑफ सायकल रॅली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळावर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फ्लॅग ऑफ सेरेमनी ऑफ सायकल रॅली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सी.आय.एस.एफ. व हुतात्मा राजगुरू स्मारक समिती यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील येरवडा जेल ते नवी दिल्लीतील राजघाट असा तब्बल एक हजार सातशे किलोमीटरचा सायकल प्रवास ४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान सायकल रॅलीद्वारे पूर्ण केला जाणार आहे. ही सायकल रॅली येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथून शनिवारी (४ सप्टेंबर) सुरू करण्यात आली. त्याचा फ्लॅग ऑफ राजगुरुनगरात झाला.

पुणे ते दिल्ली असा एक हजार सातशे किलोमीटर प्रवास करताना रविवारी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू राष्ट्रीय स्मारक, राजगुरूवाडा येथे येऊन सी.आय.एस.एफ. यांच्या प्रमुखांनी व राजगुरूनगरमधील मान्यवरांनी सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमानिमित्त हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळावर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शानदार कार्यक्रम घेण्यात आला. सी.आय.एस.एफ.च्या जवानांनी विविध देशभक्तिपर गीते व कला सादर केल्या.

या वेळी सी.आय.एस.एफ.चे ए.डी.जी. अनिलकुमार, आय.जी. के. एन. त्रिपाठी, नीती मित्तल, लज्जाराम, सुमन कुमार, सुनील जाधव, बी. एस. गुजर, सतीश नाईकरे उपस्थित होते. राजगुरुंचे वंशज सत्यशील राजगुरु, हर्षवर्धन राजगुरु व प्रशांत राजगुरु यांच्या हस्ते राजगुरुनगरात होते. सीआयएसएफच्या वतीने आशुतोष सिंग व मिनु लांबा यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, सचिव सुशील मांजरे, विठ्ठल पाचारणे, संदीप वाळुंज, शैलेश रावळ, विश्वनाथ गोसावी, बाळासाहेब कहाणे, नितीन शहा, प्रवीण वायकर, अशोक कोरडे, अरविंद गायकवाड, सचिन भंडारी, वर्षा चासकर, प्रिया भंडारी, शोभा सांडभोर, पल्लवी खेडेकर, सचिन लांडगे, अरुण गुरव, अजय थिगळे, संतोष लाखे, योगेश गायकवाड, प्रल्हाद कुंभार, अरुण गुंडाळ उपस्थित होते.