शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आधी काम, मग मिळतोय चारा

By admin | Updated: May 11, 2017 04:10 IST

मेंढपाळांना आपली बकरी शेतात बसवण्यासाठी यापूर्वी शेतकरी धान्य द्यायचे किंवा काही शेतकरी चारा देऊनही दिवसानुसार

लोकमत न्यूज नेटवर्ककारेगाव : मेंढपाळांना आपली बकरी शेतात बसवण्यासाठी यापूर्वी शेतकरी धान्य द्यायचे किंवा काही शेतकरी चारा देऊनही दिवसानुसार काही ठराविक रक्कम द्यायचे. परंतु आता चारा हवा असल्यास शेतकऱ्यांच्या शेतात मेंढपाळाना राबावे लागत आहे. त्यामुळे मेंढपाळ अडचणीत सापडला आहे.पुणे जिल्ह्यात कांदाकाढणी अंतिम टप्प्यात आली आहे. कांदापातीचे पाच ते सहा महिने बकरीसाठी खाद्य उपलब्ध होते. परंतु, आधी कांदाकाढणी करा व त्यानंतर दररोज कांदाकाढणी होईपर्यंत कामासाठी मेंढपाळ महिला जात आहेत. त्यामुळे चारा मिळण्यासाठी मेंढपाळाना शेतकऱ्यांच्या शेतात राबावे लागत आहे. उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे सकाळी लवकरच बकरी चारणी करण्यासाठी सोडावी लागत आहेत. त्यामुळे पहाटे उठून मेंढपाळ शेतात राबत आहेत. कोणतेही पीक निघाल्यानंतर त्यात असणारे गवत बकरी खाते. त्यामुळे शेतातील तण आपोआप नष्ट होते. गवत बकरीने खाल्ल्याने शेतकऱ्यांच्या कष्टात बचत होते. तसेच बकरीपासून मिळणारे लेंडीखत जमिनीतील सुपीकता वाढवते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळ आहे. तसेच पुणे जिल्ह्यात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होतो. परंतु याच चारासाठी मेंढपाळ दिवसभर शेतकऱ्यांच्या शेतात राबत आहेत. त्यामुळे एकीकडे चारा नसल्याने मेंढपाळ अडचणीत आला आहे, तर दुसरीकडे त्याला चारा मिळवण्यासाठी कष्ट करावे लागत आहे. बकरी चारावयाची असल्यास सगळा कांदा काढावा लागतो. काही शेतकरी थोडीफार मजुरी म्हणून पैसे मेंढपाळांना आपली बकरी शेतात बसवण्यासाठी यापूर्वी शेतकरी धान्य द्यायचे किंवा काही शेतकरी चारा देऊनही दिवसानुसार काही ठराविक रक्कम द्यायचे. परंतु आता चारा हवा असल्यास शेतकऱ्यांच्या शेतात राबावे लागत आहे.त्यामुळे मेंढपाळ अडचणीत सापडला आहे, तर काही शेतकरी पैसे देत नाहीत. चारा उपलब्ध होत नसल्याने नाईलाज असूनही काम करावे लागत आहे. काम नाही केले तर कोणी चारा देत नाही. दिवसभर बकरी चारायची की काम करायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे, असे मेंढपाळ पांडा कचरे यांनी सांगितले.