शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत भाजप प्रथमस्थानी

By admin | Updated: October 24, 2014 05:23 IST

मोदी लाटेत सर्वाधिक खेचून शहरातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने स्थान मिळविले आहे.

मिलिंद कांबळे, पिंपरीमोदी लाटेत सर्वाधिक खेचून शहरातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने स्थान मिळविले आहे. दोन्ही खासदार पक्षाचे आणि ३८ हजार मतांची वाढ होऊनही शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. महापालिकेत सत्ता असताना आणि ४७ हजार ६६६ ने मतांत वाढ होऊनही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. भारतीय रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) अनपेक्षितपणे चौथे स्थान पटकाविले.विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघांत मिळवून एकूण ६ लाख ८० हजार ४२९ जणांनी मतदान केले. मोदी लाटेत भाजपला मोठा फायदा झाला. पक्षाने एकूण १ लाख ६७ हजार ४१२ मते मिळाली. झालेल्या मतांपैकी ही २४.६० टक्के मते आहेत. इतके मते घेऊनही केवळ चिंचवड या एकाच मतदारसंघामध्ये भाजपला विजय मिळविता आला. पिंपरी मतदारसंघ आरपीआयला सोडण्यात आला होता. २००९ च्या निवडणुकीत भाजप केवळ पिंपरी मतदारसंघातच लढला. तेथे ५१ हजार ५३४ मते होती. तिन्ही मतदारसंघ हे मावळ आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघांत समाविष्ट आहेत. दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. शिवसेनेने तिन्ही ठिकाणी मिळून २३.४३ टक्के म्हणजे १ लाख ५९ हजार ४४२ मते खेचत शहरात दुसरे स्थान मिळविले. पिंपरीत भगवा फडकविण्यात पक्ष यशस्वी ठरला. इतर दोन्ही ठिकाणी पक्ष दुसऱ्या स्थानी राहिला. गेल्या २००९ मध्ये पक्षाला १ लाख २१ हजार ३६६ मते घेत शहरात प्रथमस्थानी होता. यंदा ३८ हजार ७६ मतांत वाढ होऊनही पक्षाचे स्थान घसरले.महापालिकेत सत्ता असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकाची १ लाख ३५ हजार ५२५ मते मिळाली. ही १९.९१ टक्के मते आहेत. असे असतानाही पक्षाला एका ठिकाणी विजय मिळवीत आला नाही. गेल्या वेळेस पक्षाला पिंपरी आणि भोसरी असा दोन ठिकाणी एकूण ८७ हजार ८५९ मते होती. आरपीआयने पिंपरी या एकाच मतदारसंघात ४७ हजार ७६१ मते (७.०१ टक्के) घेतली. अनपेक्षितपणे पक्षाने शहरात चौथे स्थान मिळविले. गेल्या वेळेस केवळ ११ हजार १४६ मते होती. तिन्ही ठिकाणी कॉँग्रेसला ५.०३ टक्के म्हणजे अवघी ३४ हजार २९१ मते मिळाली. शहरात पक्ष पाचव्या स्थानावर राहिला. गेल्या निवडणुकीत पक्षाने केवळ चिंचवड या एका मतदारसंघात २४ हजार ६८४ मते घेतली होती. यंदा प्रथमच निवडणुकीत उतरलेल्या मनसेने एकूण १७ हजार ६१७ मते घेत सहावे स्थान मिळविले. बहुजन समाज पक्षाने १.४५ टक्के म्हणजे एकूण ९ हजार ८७६ मते घेत अखेरच्या सातव्या स्थानावर राहिला. गेल्या वेळेपेक्षा ही मते २ हजार ५७ ने कमी आहेत.