शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच ‘मोबाईल अ‍ॅप’चा वापर

By admin | Updated: July 18, 2015 04:20 IST

मतदान केंद्रातील कर्मचारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात संपर्क ठेवण्यासाठी नवीन मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्या अ‍ॅपचा वापर पहिल्यांदाच

पुणे : मतदान केंद्रातील कर्मचारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात संपर्क ठेवण्यासाठी नवीन मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्या अ‍ॅपचा वापर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये संपर्क ठेवणे सोपे होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधिकारी जय जाधव उपस्थित होते. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी निवडणुका सुरळीत होण्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या. निवडणुकीसाठी १८ हजार २०६ अधिकारी आणि कर्मचारी नेमण्यात आले आहेत. निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ६ हजार पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या लोकसभा आणि विधानसभेच्या धर्तीवर नि:पक्षपाती वातावरणात आणि सुरळीतपणे पार पडतील, याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी. ४ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी पाऊस झाल्यास मतदानामध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाला विशेष तयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सहारिया यांनी सांगितले. निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणे होणार आहेत. जिल्ह्यातील ७०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तर १९६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उमेदवारांचा वेळ वाचावा यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज आॅनलाइन उपलब्ध करून दिला आहे. आॅनलाइन अर्जाचा पहिला प्रयोग भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात २१ हजार उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातील ३ हजार ५०० लोकांनी अर्ज जमा केले आहेत. आॅनलाइनमुळे उमेदवारांना चांगला फायदा झाला आहे.