शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

फौजदाराच्याच अंगावर घातले वाहन

By admin | Updated: May 19, 2017 04:32 IST

चोरट्या वाळूची बेकायदा वाहतूक करणारांना अटकाव केल्यामुळे फौजदाराच्या अंगावर वाळू वाहतूक करणारे वाहन घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी रात्री

- लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : चोरट्या वाळूची बेकायदा वाहतूक करणारांना अटकाव केल्यामुळे फौजदाराच्या अंगावर वाळू वाहतूक करणारे वाहन घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. शहरातील कदम हॉस्पिटल चौकात ही घटना घडला. हा प्रकार करून वाहन घेऊन चालक पसार झाला.हे वाहन जाऊ द्यावे, याकरिता फौजदाराच्या दुचाकीची चावी काढून घेऊन त्याच्याबरोबर झटापट केल्याच्या आरोपावरून दुचाकीवरून आलेल्या दोघा भावांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बाबा जाधव, ज्ञानेश्वर बाबा जाधव (दोघे रा. माळवाडी नंबर १, ता. इंदापूर ) अशी त्यांची नावे आहेत. फौजदार अमोल रवींद्र ननवरे यांनी त्यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.ठाणे अंमलदार शिरीष लोंढे यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यातील काम आटोपून रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी ननवरे हे दत्तनगर येथील त्यांच्या घराकडे निघाले होते. पोलीस वसाहतीच्या पाठीमागे असणाऱ्या कदम हॉस्पिटल चौकातून जात असताना, समोरच्या कालठण नं. २ च्या रस्त्यावरुन वाळूने भरलेला विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर जोरात आपल्या रोखाने येत असल्याचे ननवरे यांनी पाहिले. त्यास चौकात अडवून ते चौकशी करत असताना, पडस्थळ रस्त्याने इंदापूरकडे येणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी वाट देण्यासाठी काही मिनिटांसाठी ननवरे बाजुला झाले.हीच संधी साधून ट्रॅक्टर वरील चालकाने थेट ननवरे त्याला थांब म्हणत असताना त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. या अकस्मात हल्ल्यातून ननवरे यांनी कशीतरी सुटका करुन घेतली. तो ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेवून पसार झाला.याच वेळी त्या ट्रॅक्टरच्या मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ननवरेंच्या दुचाकीची चावी हिसकावून घेतली. वाळू भरलेला ट्रॅक्टर आमचा आहे. तो ट्रॅक्टर अडवायचा नाही. तो लांब जाईपर्यंत येथून जायचे नाही, असे म्हणत या दोघांनी ननवरे यांच्याशी झटापट केली. संधी साधून ननवरे यांनी आपले सहकारी पोलीस कर्मचारी डी. आर. अर्जुन व आर. डी. बडे यांना बोलावून घेतले. ते येत असल्याचे पाहून आरोपींपैकी ज्ञानेश्वर जाधव हा तेथून पळून गेला. गणेश जाधव यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. ट्रॅक्टर चालकाचे नाव समजले नाही. पोलीस निरीक्षक सजन हंकारे पुढील तपास करीत आहेत.