शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दौंडला फटाक्याच्या गोडाऊनला आग

By admin | Updated: June 3, 2016 00:43 IST

दौंड येथील अहिल्यादेवी होळकर सहकार चौकात फटाक्यांच्या गोडाऊनला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

दौंड : दौंड येथील अहिल्यादेवी होळकर सहकार चौकात फटाक्यांच्या गोडाऊनला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. शहराच्या भरवस्तीत पोखरना यांचे हे गोडाऊन होते़ रात्री उशिरापर्यंत आग धुमसत होती़आग लागल्यानंतर फटाक्याचे मोठेमोठे स्फोट झाले. त्यामुळे दौंड शहरासह अवघा परिसर हादरला. त्यामुळे नागरिकांमध्ये शंकाकुशंका निर्माण होऊन भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, फटाक्यांच्या गोडाऊनला आग लागल्याचे समजताच शहरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला. फटाक्यांचे जसेजसे स्फोट होत होते, त्यानुसार आगीच्या ज्वाळा भडकत होत्या. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली. मात्र, या गर्दीला पोलिसांना आवर घालता-घालता नाकेनऊ आले. दौंड शुगर, दौंड नगर परिषद, कुरकुंभ औद्योगिक वसाहत येथील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. शहरातील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पोलीस यंत्रणा यांनी आग विझविण्यासाठी जिवाची बाजी लावली. फटाक्यांची तीव्रता भयानक असल्याने एकच गोंधळ झाला होता. तर, दुसरीकडे अचानक वारे सुरू झाल्याने आग पसरत गेली. गोडाऊनशेजारील गोडाऊन मालकाच्या घरात एका सिलिंडरने पेट घेतला होता. मात्र, सिलिंडरचा पेट वेळीच आवरल्याने पुढील अनर्थ टळला. तर, अन्य दोन सिलिंडर आग लागल्यानंतर घराबाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सायंकाळी साडेपाच वाजता सुरू झालेली ही आग सायंकाळी सातच्या सुमारास आटोक्यात आली.(वार्ताहर)