शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान न केल्यास ५०० रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:26 IST

पुणे : पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. यापुढे जे कर्मचारी गणवेश परिधान करणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांना ...

पुणे : पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. यापुढे जे कर्मचारी गणवेश परिधान करणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. अतिरीक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये याविषयी निर्णय घेण्यात आला.

पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना पालिकेने गणवेश दिलेले आहेत. सर्वजणांना खाकी रंगाचे गणवेश देण्यात आलेले आहेत. या गणवेशावर पालिकेचे मानचिन्ह (लोहो) ही छापण्यात आलेले आहे. परंतू, पालिकेचे पुरुष-स्त्री कर्मचारी त्यांना देण्यात आलेले गणवेश परिधान करीत नाहीत. दैनंदिन वापराच्या कपड्यांवरच ते साफ-सफाईची कामे करीत असल्याचे चित्र आहे. यासोबतच कचरा संकलन करणाऱ्या गाड्या, घंटा गाड्या, रस्ते झाडणारे, ड्रेनेज स्वच्छता आदी कामे करणारे पालिकेचे कर्मचारी गणवेश घालत नसल्याचे अधिका-यांच्या पाहणीमध्ये समोर आले आहे.

सध्या फक्त स्वच्छ संस्थेचे कर्मचारी त्यांचे अ‍ॅप्रन व ओळखपत्र परिधान करुन काम करतात. अशाच प्रकारे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. जेणेकरुन अधिकारी व नागरिकांनाही पालिकेचे कर्मचारी कोण आहेत याची ओळख पटेल. कर्मचाऱ्यांनी गणवेश घालावा आणि शिस्त पाळली जावी याकरिता आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासोबतच शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. याबाबतच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयाला देण्यात आल्या आहेत.