शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पायल रोहतगीचा बोलविता धनी शोधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंडित नेहरूंची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगी हिच्यावर कारवाई होईलच, पण तिच्या मागचा बोलविता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पंडित नेहरूंची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगी हिच्यावर कारवाई होईलच, पण तिच्या मागचा बोलविता धनी वेगळा आहे, त्याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी शहर काँगेसने केली.

शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, शहर सरचिटणीस रमेश अय्यर, फिर्यादी संगीता तिवारी, इंटकचे कैलास कदम, दत्ता बहिरट यावेळी उपस्थित होते. पंडित नेहरू आधुनिक भारताचे भाग्यविधाते आहेत. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान केले आहे. एखादी अभिनेत्री त्यांंची बदनामी करते त्यावेळी ती एकटी नसते. तिच्यामागे कोणीतरी भक्कमपणे उभे असते, त्यांचा शोध घ्यावा, अशी आमची मागणी असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बागवे म्हणाले, या विचारधारेच्या प्रयत्नांमधून नेत्यांचीच नाही तर देशाचीही बदनामी होत आहे. यातून काँग्रेस कार्यकर्त्यांचा संयम सुटला तर त्याला जबाबदार कोण? जोशी यांनी रोहतगीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते ठिकठिकाणी फिर्यादी दाखल करतील असे सांगितले.

रोहतगी हिने चित्रफित तयार करून ती समाजमाध्यमांवर पोस्ट केली. हा विकृत प्रकार आहे. काँग्रेसच्या विचारांना, काँग्रेसच्या नेत्यांना भारतीय जनतेच्या मनात अढळ स्थान आहे, त्याला धक्का लावता येत नसल्याने संतापलेल्या कोणीतरी अशी विकृत माणसे उभी केली आहेत. पोलीस त्यांचा समाचार घेतीलच. पण खरे गुन्हेगार त्यांच्यामागे थांबलेले लोक आहेत, पोलिसांनी त्यांना पकडावे व त्यांच्यावर कडक कारवाई करावी. म्हणजे याप्रकारचे गुन्हे करण्यास कोणी धजावणार नाही, असे मत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.