शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेत अखेर २३ गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिका हद्दीमध्ये २३ गावे समाविष्ट करण्याबाबतची प्रारूप अधिसूचना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे महापालिका हद्दीमध्ये २३ गावे समाविष्ट करण्याबाबतची प्रारूप अधिसूचना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने बुधवारी (दि. २३) जाहीर केली़ याद्वारे पुणे महापालिका हद्दीत शहरालगतची २३ गावे समाविष्ट करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने शिक्कामोर्तब केले. मात्र, ही गावे महापालिका हद्दीतील भाग बनावी की नाही, यासाठी हरकती व सूचना (आक्षेप) दाखल करण्यास पुढील महिन्याचा कालावधी दिला.

राज्य शासनाच्या या अधिसूचनेस म्हणजेच पुणे महापालिकेत २३ गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयास आक्षेप घेण्यासाठी महिनाभरात पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी कारणे सादर करणे आवश्यक आहे़ या कालावधीत आलेल्या आक्षेपांवरच शासनाकडून विचार केला जाणार आहे़ तसेच, या कालावधीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या हरकती व सूचनांचा अहवाल तयार करून तो राज्याच्या नगर विकास विभागाकडे पुढील निर्णयास पाठविणार आहे़ त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ही २३ गावे महापालिका हद्दीचा भाग बनणार की नाही, याचा अंतिम निर्णय होणार आहे़

पुणे महापालिकेने १८ डिसेंबर,२०१३ रोजी झालेल्या मुख्य सभेत पुणे शहरालगतची ३४ गावे समाविष्ट करण्याबाबतचा ठराव राज्य शासनाला पाठविला होता़ सन २०१४ मध्येही गावे पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट न झाल्याने हवेली तालुक्यातील संबंधित गावांमधील नागरिकांनी कृती समिती स्थापन करून न्यायालयात धाव घेतली होती़ त्यावेळी न्यायालयाने निर्णय देताना राज्य शासनाचा अभिप्राय मागविला होता़ या अभिप्रायात राज्य शासनाने सदरची ३४ गावे आम्ही पुणे महापालिका हद्दीत टप्प्या-टप्प्याने घेऊ असे सांगितले होते़

--------------

नव्याने समाविष्ट होणारी गावे

म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली़.

--------

निर्णय राजकीय हेतूनेच : चंद्रकांत पाटील

राज्य सरकारने २३ गावांचा पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबतचा घेतलेला निर्णय हा घिसाडघाईने आणि राजकीय हेतू डोळ्यापुढे ठेवून घेतला आहे़, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

------

मुंबईपेक्षाही वाढली पुणे महापालिकेची हद्द

पुणे शहरालगतच्या २३ गावांचा समावेश पुणे महापालिका हद्दीमध्ये होणार असल्याने, पुणे महापालिकेची हद्द क्षेत्रफळाच्या तलुनेत मुंबई शहरापेक्षा अधिक होणार आहे़ मुंबई महापालिका हद्दीचे क्षेत्रफळ ४५० चौरस किलोमीटर आहे, पण आता पुण्याचे क्षेत्र यापेक्षा जास्त म्हणजे ४८० चौरस किलोमीटर इतके होणार आहे़