शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’ आराखडा अंतिम टप्प्यात

By admin | Updated: November 22, 2015 03:40 IST

केंद्र शासनाकडे पाठवायच्या ‘स्मार्ट सिटी’ आराखड्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच तो पूर्णत्वास जाईल. पुणेकर नागरिकांकडून तीन टप्प्यांमध्ये त्यांची मते, सूचना

पुणे : केंद्र शासनाकडे पाठवायच्या ‘स्मार्ट सिटी’ आराखड्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच तो पूर्णत्वास जाईल. पुणेकर नागरिकांकडून तीन टप्प्यांमध्ये त्यांची मते, सूचना, शिफारशी जाणून घेऊन त्यांचा या आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. हा आराखडा केंद्र शासनाकडे १५ डिसेंबरपर्यंत पाठविला जाणार आहे.केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी योजने’तील १०० शहरांमध्ये पुणे शहराची निवड झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये त्यातून २० शहरांची निवड होणार आहे. त्याकरिता या १०० महापालिकांना आराखडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यातून स्पर्धा होऊन, २० शहरांची निवड होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये समावेशासाठी राज्यातून पुणे शहराची दावेदारी भक्कम मानली जात आहे. ‘स्मार्ट सिटी’चा आराखडा बनविताना पुणे महापालिकेने सुरुवातीपासून नागरिकांच्या सहभागावर भर दिला आहे. ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत विकसित करण्यासाठी ‘मॉडेल एरिया’ म्हणून औंध-बाणेर भागाची निवड केली आहे. ‘स्मार्ट सिटी प्रदर्शना’मध्ये सहभागी होण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी तिथे पाहिलेल्या काही निवडक प्रकल्पांचाही समावेश ‘स्मार्ट सिटी’ आराखड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. ‘स्मार्ट सिटी योजने’मध्ये शहरांची निवड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षकांना निमंत्रित केले जाणार आहे, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल, असाच आराखडा तयार करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.आता पुणेकरांचा ‘स्मार्ट सिटी योजने’साठी पाठिंबा दर्शविणारी प्रतिज्ञापत्रे भरून घेतली जाणार आहेत. येत्या २५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. शहराच्या समस्या सोडविण्यासाठी संपूर्ण देशासमोर आदर्श उदाहरण घालून देऊ, अशी प्रतिज्ञेचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.