शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

आॅप्शन फॉर्म भरताना...

By admin | Updated: June 19, 2014 05:15 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झाला

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, विद्यार्थ्यांना १९ ते २३ जूनपर्यंत महाविद्यालयांचे पसंतीक्रम आॅनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत. दहावीत मिळालेले गुण, संबंधित महाविद्यालयांचा मगील वर्षाचा कट आॅफ आणि शाळा व महाविद्यालयाचे घरापासूनचे अंतर याचा विचार करून विद्यार्थी व पालकांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम अर्जात (आॅप्शन फॉर्म) भरावयाचे आहेत. तेव्हाच विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचे व जवळचे महाविद्यालय मिळू शकेल, असे अकरावी प्रवेश समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याची माहिती शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सहायक शिक्षण उपसंचालक बाळासाहेब ओव्हाळ, गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गुप्ता, तसेच एमकेसीएलचे समन्वयक संदीप चिपळूणकर उपस्थित होते.शिंदे म्हणाल्या, की काही विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचा पहिला भाग भरून घेतला आहे. आत्तापर्यंत सुमारे ५७ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले असले, तरी अद्याप ६ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी पहिला भाग अ‍ॅप्रूव्ह केलेला नाही. ज्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरलेला नाही त्यांनी २३ जूनपर्यंत प्रवेशअर्जाचा पहिला व दुसरा भाग भरून पूर्ण करावा. जे विद्यार्थी प्रवेशअर्ज भरून देणार नाहीत ते प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर फेकले जाणार असल्याचे सांगण्यात आले. आॅप्शन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना व पालकांना काही अडचणी आल्यास त्यांनी प्रवेश समितीने स्थापन केलेल्या मार्गदर्शन किंवा आपल्या विभागातील शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेत मार्गदर्शक केंद्रांची व संपर्क प्रमुखांची नावे व दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)