शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

तलाव भरा ! इंदापूर, दौैंड तालुक्यातून मागणी वाढली

By admin | Updated: April 21, 2017 05:58 IST

तलावातील लाभक्षेत्रात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीतील ऊस, भाजीपाला, चारापिके आणि फळबागांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

शिर्सुफळ : येथील तलावातील लाभक्षेत्रात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीतील ऊस, भाजीपाला, चारापिके आणि फळबागांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्यावाचून पिके जळू लागली आहेत. हा तलाव खडकवासलातून कालव्यातून भरून घेण्यासठी तलावात पाणी सोडण्याची येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. परिसरातील विंधन विहिरी, विहारी कोरड्या पडल्याने लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिर्सुफळ गावची यात्रा सुरू होत आहे. शिर्सुफळ येथील शिरसाई यात्रेसाठी आजूबाजूच्या परिसरातील भाविकभक्त हजारोंच्या संख्येने शिरसाई देवीचा नवस फेडण्यासाठी येत असतात. त्यामुळे पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते. पाणी सोडण्याची मागणी शिर्सुफळ ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल हिवरकर, आप्पासाहेब आटोळे, बारामती दूध संघाचे संचालक नितीन आटोळे, विश्वास आटोळे व शिर्सुफळ येथील ग्रामस्थांची मागणी आहे.(वार्ताहर) राहू : टँकर मिळेना, तलावात पुरंदर उपसा योजनेचे पाणी तरी सोडा, अशी कळकळीची विनंती दौंड तालुक्यातील ताह्मणवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे. पाणी तलावात सोडले तर पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. हा परिसर गेल्या कित्येक वर्षांपासून तहानलेलाच असतो. ऐन उन्हाळ्यात तर टँकरने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसाबसा सोडवला जातो. यावर्षी अद्याप पिण्याच्या पाण्यासाठी टँकरही मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत दौंडचे गटविकास अधिकारी संतोष हराळे म्हणाले, की ताह्मणवाडी येथील पिण्याच्या पाण्याबाबतचा टँकरचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. त्याबाबत कार्यवाही होऊन लवकरच येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल. दौंड पंचायत समितीचे उपसभापती सुशांत दरेकर यांच्याशी संपर्क साधला असता, येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. लवकरच येथे टँकर दिला जाईल. पुरंदर उपसा योजनेचे पाणी ताह्मणवाडी तलावात सोडण्यासाठी साधारणता दोन कोटी रुपय खर्च अपेक्षित आहे. यासाठी पाटबंधारे खात्याने अंदाजित आराखडा काही वर्षांपूर्वी तयार केला आहे. परंतु त्यावर कार्यवाही झाली नाही. (वार्ताहर)