पुणो : सिंहगड स्पिं्रगडेलच्या शाळेच्या बसमध्ये चार वर्षाच्या चिमुरडीचा अमानुष लैंगिक छळ केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी बसचालक व वाहकाविरुद्ध विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. कुलकर्णी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
अमोल मारुती शेरकर (25 रा. साई हाइट्स, वडगाव बुद्रुक, ता. हवेली, मूळ रा. मु. पो. भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) व विनायक भिकाजी कारंडे (25 रा. वडगाव बुद्रुक ता. हवेली, मूळ रा. मु. पो. बलवडी ता. सांगोला, जि. सोलापूर) या दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोघांवर 376 (आय), 354, 34 तसेच लहान मुलांवरीर लैंगिक अत्याचार कलम 5 (एम), 6 , कलम 7 , 8 नुसार आरोप ठेवण्यात आले आहे.
मुख्याध्यापिका सुजाता संजीव कारंजकर (49, रा. कोथरूड) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली.
दोन्ही आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील असून, व्यवसायानिमित्त पुण्यात आले. दोघेही स्प्रिंगडेल शाळेच्या बसवर कर्मचारी म्हणून कामास लागले. दि. 5 एप्रिल रोजी त्यांनी शाळेच्या बसमध्ये के.जी. वर्गात शिकणा:या चार वर्षाच्या चिमुरडीवर घृणास्पद लैंगिक अत्याचार केला. याबाबत मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर हा प्रकार मुलीच्या पालकांनी वर्गशिक्षिका व शाळेच्या मुख्याध्यापिकांना सांगितला. तीन दिवसांनंतरही दोषींवर कारवाई न झाल्याने, त्यांनी पालक संघटनेचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर पालकांनी जमून निषेध व्यक्त करत शाळेची तोडफोड केली. घडलेल्या प्रकरणानंतर शहरामध्ये खळबळ उडाली होती. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी हे आरोपपत्र दाखल केले. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन
4पुणो : रक्त तपासणीसाठी लॅबमध्ये गेलेल्या महिलेच्या 12 वर्षीय मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. नितीन दिगंबर पाटील (वय 24, रा. राजीवनगर, विमाननगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिची आई विमाननगर येथील पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्त तपासणीकरिता गेल्या होत्या. फिर्यादी महिला मायक्रोस्कोपमधून पहात असताना त्यांची मुलगी पाठीमागे उभी होती. या महिलेचे लक्ष नसताना पीडित मुलीशी अश्लील वर्तन केले.