शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वाघोलीतील सर्वच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:26 IST

आव्हाळवाडी : वाघोली येथील जेएसपीएम शैक्षणिक संकुलाच्या शेजारी असणाऱ्या अनधिकृत बांधकामावर पोलीस बंदोबस्तात पीएमआरडीएच्यावतीने कारवाई करून अकरा जणांवर गुन्हे ...

आव्हाळवाडी : वाघोली येथील जेएसपीएम शैक्षणिक संकुलाच्या शेजारी असणाऱ्या अनधिकृत बांधकामावर पोलीस बंदोबस्तात पीएमआरडीएच्यावतीने कारवाई करून अकरा जणांवर गुन्हे दाखल केले. या कारवाईबाबत काहीही हरकत नाही. परंतु, केवळ काही विशिष्ट बांधकामांवर कारवाई न करता हद्दीत मोठ्या संख्येने असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे कारवाई झालेल्या अकरा जणांनी पीएमआरडीए आयुक्तांकडे केली आहे.

पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी २३ नोव्हेंबर रोजी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी ११ जणांवर संबधित पोलीस स्टेशनमध्ये ५३/१ अंतर्गत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले. पीएमआरडीएकडून बांधकामांवर केलेल्या कारवाईबाबत काहीही हरकत नाही. परंतु, हद्दीत असणाऱ्या अनधिकृत बांधकामांबाबत असंख्य तक्रारी दाखल असताना केवळ काही विशिष्ट बांधकामांवरच कारवाई करून गुन्हे केले जात आहेत.

कोट

२४ नोव्हेंबर रोजी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून वाघोली गाव पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यामुळे पीएमआडीएला बांधकामांवर कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. वाघोली गाव महापालिकेच्या की पीएमआडीएच्या हद्दीत याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

- राजेंद्र सातव-पाटील, माजी उपसरपंच, वाघोली

कोट

पीएमआडीएच्या हद्दीमधील हजारोंच्या संख्येत तक्रारी असताना केवळ विशिष्ट बांधकामांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले जात आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करणे अन्यायकारक आहे. पीएमआडीएने हद्दीत असणाऱ्या सर्वच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, अन्यथा याप्रकरणी न्यायालयाकडे धाव घेणार आहे.

-संदीप कटके, अध्यक्ष, जी. के. फाउंडेशन