शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरशी लढताना...

By admin | Updated: February 2, 2015 23:26 IST

महागडी औषधेच जास्त गुणकारी, असा एक समज आपल्या मनात असतो. कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा होण्यासाठी आर्थिक तडजोडी करून औषधोपचार केले जातात.

महागडी औषधेच जास्त गुणकारी, असा एक समज आपल्या मनात असतो. कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा होण्यासाठी आर्थिक तडजोडी करून औषधोपचार केले जातात. परंतु, यासाठीही जेनेरिक औषधांचाही पर्याय आहे.णे एकेकाळी कॅन्सर म्हटला, की लोकांच्या उरात धडकी भरत असे. कारण त्यावर उपचारच उपलब्ध नव्हते. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्राने हे आव्हान स्वीकारले. एकेकाळी रुग्णांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या कर्करोगावर अमाप संशोधन झाले. कर्करोगाची कारणे, निदान व उपचार यात अभूतपूर्व प्रगती झाली. याचा अर्थ असा नव्हे, की मानवाने त्यावर विजय मिळवला. आजही ही प्रगती अपूर्ण आहे. तथापि, अनेक प्रकारच्या कर्करोगांचे अचूक निदान व त्यातील बऱ्याचशा प्रकारांवर विविध उपचार उपलब्ध झाले आहेत. त्यातील काही रुग्णांचे आयुष्य व त्याचा दर्जा वाढवणारे तर काही मृत्यूपर्यंतचे जीवन सुखद वा सुसह्य करणारे आहेत.कर्क रुग्णाच्या उपचारासाठी वैद्यकांचे सांघिक प्रयत्न महत्त्वाचे असतात. कारण कॅन्सरचे कितीतरी प्रकार आहेत. विविध चाचण्याव्दारे कॅन्सरच आहे ना? असल्यास कुठल्या प्रकारचा व तो किती गंभीर स्वरूपाचा (स्टेज) आहे, याचे निदान करता येते व उपचाराची रूपरेषा ठरते.कॅन्सरवर तीन प्रकारच्या प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध आहेत. पैकी एक म्हणजे शस्त्रक्रिया. कर्कग्रस्त अवयव जीवनावश्यक नसेल तर तो काढून टाकला की रुग्ण रोगमुक्त होऊ शकतो. दुसरा उपाय म्हणजे कर्करोधी औषधे. वेगवेगळ्या प्रकारच्या कर्कासाठी वेगवेगळी औषधे वापरली जातात. बहुतेक कर्कांना निष्प्रभ करण्यासाठी एकाहून अधिक औषधे द्यावी लागतात. तिसरी उपचारपद्धती म्हणजे किरणोपचार (रेडिएशन) थेरपी यातही वेगवेगळे प्रकार असून हे उपचारही फेरीपद्धतीने घ्यावे लागतात. आणखी गुंतागुंतीची बाब म्हणजे कॅन्सरनुसार या तिन्ही उपचारपद्धतींचा रास्त सयुक्तिक वापर करावा लागतो. म्हणजे काही कॅन्सर यापैकी केवळ एकाच पद्धतीने बरे होतील, काहींना दोन पद्धती वापराव्या लागतील तर काहींसाठी रुग्णाला तिन्ही उपचार घेणे अनिवार्य होय. या उपचारपद्धतींचा क्रमही कर्कानुसार बदलतो. म्हणजे एखाद्या कॅन्सरसाठी आधी औषधे, मग शस्त्रक्रिया व नंतर किरणोपचार तर दुसऱ्या कर्कासाठी वेगळा क्रम अधिक उपयुक्त ठरतो. म्हणून कॅन्सरसाठी उपचार घेताना या सर्व प्रकारच्या तज्ज्ञांची एकत्रित चर्चा होऊन सर्वाधिक रास्त उपचार करणे फार महत्त्वाचे असते. पूर्वी कॅन्सर म्हणजे साक्षात मृत्यूच असे साधारण समीकरण होते. आता ही परिस्थिती बरीच सुधारली आहे. अनेक प्रकारच्या कर्काविरुद्ध आपण लढू शकतो आणि काहींविरुद्ध तर जिंकूही शकतो! काहींशी समेट करावा लागतो. थोड्याच कॅन्सरना वा गंभीर कॅन्सरना आपल्याला नाइलाजाने शरण जावे लागते. थोडक्यात कॅन्सरला आता पूर्वीइतके घाबरण्याची गरज नाही. शक्य त्या कर्काला प्रतिबंध (उदा. तंबाखू / धूम्रपान वर्ज्य), शक्य तेवढ्या लवकर निदान व उपलब्ध सर्वात प्रभावी उपचारांचा अवलंब या त्रिसूत्रीवर आपले कर्कविरोधी युद्ध चालू आहे.अनेक कॅन्सरचे निदान व त्यावरील उपचार ही बरीच खर्चिक बाब आहे. बऱ्याचदा हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. त्याला मुख्य खर्च औषधांचा असतो. नवनवी कर्करोधी औषधे प्रचंड महाग असतात. यावर मुख्य उपाय म्हणजे मूळ (जेनेरिक) नावाची औषधे वापरणे. अशी औषधे व्यापारी (ब्रँड) नावाने उपलब्ध औषधांपेक्षा खूपच स्वस्त असतात आणि ती तितकीच गुणकारी असल्याची खात्री करून घेतलेली असते. तेव्हा रुग्णांनी संकोच न बाळगता कॅन्सरतज्ज्ञांशी आपल्या आर्थिक अडचणीबद्दल बोलावे व त्यांना किमान किमतीचे पण तितकेच प्रभावी औषध देण्याबद्दल सांगावे. सध्या भारतात अनेक कर्करोधी औषधे उपलब्ध आहेत. अगदी नव्या औषधांची जेनेरिक उपलब्धता नसते. मात्र, विविध रुग्णालयात त्यावरील चिकित्सा चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) सुरू असतात. त्या चाचण्यांची साद्यंत माहिती घेऊन रुग्ण त्यात सहभागी होऊ शकतात. लेखक बी. जे. मेडिकल महाविद्यालयात औषधशास्त्रविषयाचे प्राध्यापक (एम. डी.) आहेत.डॉ. पद्माकर पंडित