शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले सिंहगडावर दीपोत्सव

By admin | Updated: November 12, 2015 02:35 IST

तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष असलेला ऐतिहासिक सिंहगड शिवप्रेमींना स्वराज्य निष्ठेची शिकवण देत, गड-किल्ल्यांकडे आकर्षित करू लागला असून,

सिंहगड रस्ता : तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष असलेला ऐतिहासिक सिंहगड शिवप्रेमींना स्वराज्य निष्ठेची शिकवण देत, गड-किल्ल्यांकडे आकर्षित करू लागला असून, दीपावलीच्या उत्सवकाळातही शिवप्रेमी मावळ्यांची पाऊले मालुसरेंना आदरांजली वाहण्यासाठी गडाकडे वळू लागली आहेत.या वर्षीही नरकचतुर्दशीच्या मंगलदिनी कोंढवे-धावडे येथील भूलेश्वर तरुण मंडळाने पुणे दरवाजा व पादचारी मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. त्यासाठी खास जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. उपसरपंच अतुल (अप्पा) धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक पुणे दरवाजा व पादचारी मार्गावर विद्युत दिव्यांची रोषणाई केल्याने दरवाजे व पादचारी मार्ग उजळला होता.या सणाचे औचित्य साधून सतत अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या पराक्रमी सेनापतीला आदरांजली वाहण्याचा हा प्रयत्न आहे. पहिल्या दिवशी नांदेड येथील सन्मित्र फाउंडेशनच्या वतीने मालुसरे यांच्या समाधिस्थळी दीपोत्सव केला गेला होता. तसेच कोंढाणेश्वर मंदिरात पूजा, अभिषेक करून फुलांच्या माळा लावून मंदिर आकर्षितपणे सजविले होते. राहुल घुले मित्र परिवाराने त्या कार्यक्रमाचे अतिशय नेटकेपणाने आयोजन केले होते. ऐतिहासिक वास्तूला रोषणाई व सजावट करण्याचा उत्सवाचा मूळ हेतू आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खंडोजी नाईक-कोळी यांचे वंशज व स्थानिक ग्रामस्थांकडून अभिषेक, दीपोत्सव केला जाणार असून, चौथ्या दिवशी ढमढेरे परिवार व शिवप्रेमी राजाराममहाराज समाधिस्थळी दीपोत्सव करतील. पाचव्या दिवशी सिंहगड पावित्र्य मोहिमेच्या कार्यकर्त्यांकडून अमृतेश्वर मंदिरात दीपोत्सव व विशेष सजावट केली जाणार आहे. (वार्ताहर)