शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या किमती वाढायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:09 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार : बारामती येथे बैठकीत केली टीका लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : खतांच्या किमती वाढायला केंद्र ...

उपमुख्यमंत्री अजित पवार : बारामती येथे बैठकीत केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : खतांच्या किमती वाढायला केंद्र सरकार जबाबदार आहे. स्फूरद आणि पालाशच्या किमती वाढल्याने युरियाकडे वळू नये. केंद्र सरकारला आमचं आवाहन आहे की, खतांच्या किमती कमी कराव्यात. शेतकऱ्यांनी इतर प्रकारची खाते वापरावीत. शेतकऱ्यांना खरीप बैठकीत शेतकऱ्यांना असे आवाहन केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बारामती येथील बैठीकनंतर विद्या प्रतिष्ठानच्या आवारात पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पवार म्हणाले की, बारामतीत व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या अधिक आहे. तीच परिस्थिती पुणे, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण मध्ये आहे. परिस्थिती बऱ्याच अंशी बदलत आहे. मात्र, कोरोना नियमावलीचे सर्वांनी भान ठेवणे आवश्यक आहे, तरच कोरोना आटोक्यात आणण्यात यश येईल. रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेवढा मधल्या काळात जेवढा रेमडेसिविरचा तुटवडा होता, तेवढा आता जाणवत नाही. जेवढी लस पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला लस मिळत नाही. भारत बायोटेकला जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे लस उत्पादन सुरू होईल. एकदा लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली की, मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू करता येईल.

आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणी दोघांच्या एकमेकांना विरुद्ध तक्रारी दाखल आहेत. त्याची चौकशी सुरू आहे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पवार म्हणाले. पुढच्या ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला आहे. अशा वेळी आवश्यक काळजी घेण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.

चौकट

म्युकरमायकोसिस हा आजार पूर्वी एवढ्या मोठ्या संख्येने आढळला नव्हता. आज प्रांताधिकाऱ्यांना याबाबत खासगी डॉक्टरांना माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भातील इंजेक्शनचा तुटवडा आहे. मुंबईला गेल्यावर याबाबत सचिवांसह इतरांबरोबर बैठक घेण्यात येईल. त्यानंतर आवश्यक पुरवठा सुरळीत करण्यात येईल. यावरील उपचाराचा महात्मा फुले जनाआरोग्य योजनेत अंतर्भाव केला असल्याचे पवार म्हणाले.