शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिवाच्या भीतीने तो बाळगत होता पिस्तूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सुमारे ३ वर्षांपूर्वी त्याने एकाचा खुनाचा प्रयत्न केला होता. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचे २ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सुमारे ३ वर्षांपूर्वी त्याने एकाचा खुनाचा प्रयत्न केला होता. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचे २ आणि मारामारीचा एक असे तीन गुन्हे दाखल होते. पूर्वीच्या या गुन्ह्यातून आपल्याही जिवाचे काही बरे-वाईट होईल, अशी भीती त्याला नेहमी वाटत होती. त्यासाठी तो आपल्याजवळ पिस्तूल बाळगत होता. त्याच्यावर कोणी हल्ला केला नाही. पण, पिस्तूल बाळगत असल्याची कानोकानी खबर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाला मिळाली अन् तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

अनिकेत राजेंद्र लांडे (वय २१, रा. मादगुडेवाडी, पो. तांबड, ता. भोर) असे त्याचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस अंमलदार अमोल पवार यांना माहिती मिळाली की, एक मुलगा भवानी पेठेतील सोनाईदाद प्रतिष्ठाणजवळ पिस्तूल घेऊन उभा आहे. या माहितीची खात्री करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख, आय्याज दड्डीकर, योगेश जगताप, महेश बामगुडे, सतीश भालेकर, शशिकांत दरेकर यांनी त्या ठिकाणी जाऊन अनिकेत लांडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याविरुद्ध मार्केट यार्ड, बिबवेवाडी, हवेली पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल आहेत. अधिक तपासासाठी न्यायालयाने १९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगार सोमागौडा गुरन्ना चौधरी (वय २८, रा. आंबेडकर नगर, मार्केट यार्ड) हा कात्रज-कोंढवा रोडवर थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल व ३ काडतुसे मिळून आली. सोमागौडा चौधरी हाही सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत व घरफोडी असे चोरीचे गुन्हे दाखल आहे. सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली.