शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

डेपोतील कचरा न उचलल्याने साथीच्या रोगाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST

पोलीस स्टेशनपासून शहरात जाणाऱ्या रस्त्यावर कचरा ओसांडून वाहू लागला आहे. या ओल्या कचऱ्यावर डुकरे आणि भटक्या कुत्र्यांनी ...

पोलीस स्टेशनपासून शहरात जाणाऱ्या रस्त्यावर कचरा ओसांडून वाहू लागला आहे. या ओल्या कचऱ्यावर डुकरे आणि भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. तर सुका कचरा साठवण्याच्या जागेत ओला कचरा टाकण्याची नामुष्की नगरपरिषदेवर आली आहे. तर, या कचऱ्यातील पावसाचे पाणी मैदानातून थेट पोलीस स्टेशनच्या आवारात दुर्गंधीयुक्त काळे पाणी येत आहे. शहरातील कचरा एवढ्या मोठ्या प्रमाणात साचला आहे की, आता कचरा टाकण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. त्यातच पाऊस पडल्याने हा कचरा भिजला असून कुजला आहे. त्यातून परिसरात दुर्गंधी पसरली असून साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वेळोवेळी नगरपरिषदेला याबाबत तक्रारी आणि निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ‘आम्ही राजगुरुनगरकर’ या संघटनेच्या वतीने नगरपरिषद प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस स्टेशन या कार्यालयांना निवेदन देऊन त्वरित कचरा हटवण्याची मागणी करण्यात आली. सदरचा कचरा दहा जूनपर्यंत उचलला न गेल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, निवेदन स्वीकारताना मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी पुढील पाच दिवसांत हा कचरा हटवला जाईल असे आश्वासन दिले तर प्रांताधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रशासक विक्रांत चव्हाण यांनी आजच यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले. या कामात पुढील चार दिवसांत प्रगती न दिसल्यास सदरचा कचरा भरून तो नगरपरिषदेच्या दारात खाली करण्याचा इशारा ‘आम्ही राजगुरुनगरकर’च्या शिष्टमंडळाने दिला.

यावेळी अमर टाटीया, राहुल पिंगळे, मिलिंद शिंदे, नितीन सैद, शंकर राक्षे, राहुल आढारी, नीतेश पवार, स्वप्निल माटे, दीपक थिगळे, नीलेश आंधळे उपस्थित होते.

नगरपरिषेदेने वाकी (ता. खेड) येथे एक एकर जागा कचरा साठविण्यासाठी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे हा सर्व साचलेला कचरा उचलून तिथे टाकण्यात येणार आहे. त्यामुळे येथील जागा मोकळी होणार आहे. त्या जागी शहरातील दररोज जमा होणारा ओला व सुका कचरा टाकून तो रोजच रोज प्रक्रियासाठी पाठविण्यात येणार आहे.

प्रकाश पाटील

मुख्याधिकारी राजगुरुनगर नगर परिषद

०७ राजगुरुनगर

कचरा डेपोत जागा नसल्यामुळे रस्त्यावर टाकलेला कचरा