शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहूबेटात उपोषणाची वेळ : थोरात

By admin | Updated: June 3, 2016 00:41 IST

राहूबेटातील दहिटणे येथील विविध विकासकामांच्या मागण्यांसाठी कार्यकर्त्यांवर उपोषण करण्याची वेळ आली असल्याचे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले.

राहू : राहूबेटातील दहिटणे येथील विविध विकासकामांच्या मागण्यांसाठी कार्यकर्त्यांवर उपोषण करण्याची वेळ आली असल्याचे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले.दहिटणे (ता. दौंड) येथे उमेश म्हेत्रे यांनी दहिटणे परिसरातील मुळा-मुठा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला संरक्षक कठडे बसविणे, दहिटणे ते राहू व दहिटणे ते मिरवडीदरम्यान रस्त्यावरील खड्डे व दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे काढणे व दहिटणे स्मशानभूमी परिसरातील खड्डे बुजवणे तसेच सहजपूर, नांदूर, खामगाव, दहिटणे, देवकरवाडी परिसरातील महावितरण कंपनीच्या वीजवाहक तारा खराब झाल्या असून, वेळोवेळी वीज खंडित होऊन या भागातील शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद असतात यासह अन्य काही मागण्यांसाठी शासनाच्या विरोधात तीन दिवस येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर उपोषण सुरू ठेवले होते. हे उपोषण मागे घ्यावे म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रमणध्वनीवरून उपोषणार्थीला विनंती केली. तर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी प्रत्यक्ष भेटून विनंती केल्यानंतर रमेश थोरात यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण मागे घेतले. याबाबत उमेश म्हेत्रे म्हणाले, की विद्यमान प्रतिनिधींनी याबाबत साधी चौकशी केली नाही, ही खेदाची बाब आहे. मी काही माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी उपोषण केले नसून, सामाजिक बांधिलकी म्हणून उपोषण केले आहे. या वेळी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, सरपंच सुनंदा पिलाणे, नितीन दोरगे, बाजार समितीचे बाळासाहेब थोरात, दिलीप हंडाळ, रावसाहेब पिलाणे, भास्कर देवकर पोलीस पाटील नवनाथ धुमाळ, विकास मगर, देवकरवाडीच्या सरपंच ज्योती खळदे, कोंडिबा शेळके, देवराम कोळपे, विलास कोळपे, बापू शितोळे, बापू होले, उपसरपंच लक्ष्मण शिंदे, अंकुश शितोळे व मान्यवर उपस्थित होते.(वार्ताहर)