शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सेझमध्ये विमानतळ होऊ न देण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा

By admin | Updated: November 9, 2015 01:40 IST

सेझमध्ये विमानतळ करण्यास आमचा विरोध असून, सेझबाधितांचा १५ टक्के परताव्याचा निर्णय बाकी असताना आणि सेझमुळे शेतकरी हवालदिल असताना

राजगुरुनगर : सेझमध्ये विमानतळ करण्यास आमचा विरोध असून, सेझबाधितांचा १५ टक्के परताव्याचा निर्णय बाकी असताना आणि सेझमुळे शेतकरी हवालदिल असताना जर या भागात विमानतळ करायचा प्रयत्न झाला तर काहीही झाले, अगदी रक्त सांडले तरी आम्ही विमानतळ होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे विमानतळाचा चेंडू आपल्या भागात येऊ नये, यासाठी खेड तालुक्यातीलच वेगवेगळ्या भागांतील लोक तो टोलवून लावत असल्याचे पाहावयास मिळत आहे. काल खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विमानतळ करायचा असेल तर तो सेझमध्ये सरकारी जागेत करा, असे ते म्हणाले होते. त्यावर आज सेझबाधित शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि सेझमध्ये विमानतळाला विरोध असल्याचे सांगितले.त्यावर ढवाण म्हणाले, आढळराव पाटील यांनी शेतकऱ्यांना विचारात घेऊन बोलले पाहिजे, ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत की उद्योगपतींचे? असा सवालही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. सेझ परिसरात विमानतळ होऊ नये, यासाठी ग्रामसभांचे ठराव शासनाकडे पाठविले आहेत. या भागातील जमिनी आम्ही औद्योगिकीकरणातून रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी दिल्या आहेत. त्यामुळे खासदारांनी दिशाभूल करू नये. याबाबत आढळराव पाटील म्हणाले, ‘‘सेझाबाधितांना १५ टक्के परतावा मिळावा, अशीच माझी भूमिका आहे, त्यासाठी मी सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. विमानतळ खेड तालुक्यातल्या कुठल्याही शेतकऱ्यांच्या जमिनी नव्याने संपादित करून करू नये, असे माझे म्हणणे आहे. तो करायचाच झाल्यास शेतकऱ्यांची परताव्याची जमीन वगळून जी जागा सेझ आणि सरकार यांच्या ताब्यात आहे, तेथे करावा असे माझे मत आहे. ज्या मंडळींचा तालुक्याशी आणि सेझच्या जमिनीशी संबंध नाही, त्या मंडळींच्या मोघम प्रतिक्रियांना काही अर्थ नाही.’’ (वार्ताहर)