शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST

पुणे: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी संघटनेने पणन संचालक कार्यालयासमोर ...

पुणे: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी संघटनेने पणन संचालक कार्यालयासमोर २ डिसेंबरपासून सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी सायंकाळी स्थगित केले. पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली व त्यांना लेखी पत्र दिले.

संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले, बहुसंख्य बाजार समित्यांमध्ये कडता, पोटली, पायली, अवाजवी हमाली, छुपी अडत वसूली, बोगस पावत्या, रोख पैसे दिल्यास बटावा रक्कम कापणे असे अनेक गैरप्रकार सर्रास सुरु आहेत. यात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते. संघटनेने याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्याची दखलच घेण्यात येत नाही. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला. पुण्यासह नाशिक,अकोला, लातूर, हिंगोली, परभणी, नगर या ठिकाणाचे संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

स्वतंत्र भारत पक्ष, स्वर्ण भारत पार्टी व रयत क्रांती संघटना, शंभू सेनेने आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. दोन दिवस आंदोलन केल्यानंतरही पणन मंडळाकडून दखल घेण्यात येत नव्हती. आंदोलन थांबत नाही हे लक्षात आल्यानंतर सहसंचालक कोकरे यांनी शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावले असे घनवट यांनी सांगितले. कोकरे यांनी सर्व ठिकाणाच्या गैरव्यवहारांविषयी पुराव्यांसह सांगण्यात आले. त्यांनी संघटनेला लेखी आश्वासन दिले आहे. त्यानुसार महिनाभरात तक्रार असलेल्या सर्व ठिकाणची चौकशी महिनाभरात पुर्ण करणार आहेत. तसे झाले नाही तर संघटना पुन्हा आंदोलन करेल असा इशारा घनवट यांनी दिला. आंदोलनस्थळी संघटनेच्या ललीत बहाळे, सीमा नरोडे, सतीश देशमुख, लक्ष्मीकांत कौठकर, शंकर पुरकर, अनिल चव्हाण, देविप्रसाद ढोबळे, अ‍ॅड. महेश गजेंद्र गडकर, सयाजी मोरे, दिपक शिर्के, प्रशांत पांडे यांची भाषणे झाली.