शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

बनावट नोटाप्रकरणी एकास सक्तमजुरी

By admin | Updated: May 31, 2014 22:17 IST

बनावट नोटांचा चलनात वापर केल्या प्रकरणी एकास ७ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली़

पुणे : बनावट नोटांचा चलनात वापर केल्या प्रकरणी एकास ७ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली़ मुख्य जिल्हा न्यायाधीश कालिदास वडणे यांनी हा निकाल दिला आहे़ अली बाकर शेख (वय २८, रा़ पश्चिम बंगाल) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे़ याबाबत नितीन गंगाराम चौधरी (वय २६, रा़ ताथवडे) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली होती़ ताथवडे येथील इंदिरा कॉलेजवळ चौधरी यांचे किराणा दुकान आहे़ ६ जुलै २०११ रोजी शेख याने ५०० रुपयांची नोट देऊन सिगारेटचे पाकिट विकत घेतले़ त्यावेळी चौधरी यांनी शेख याला शंभर रुपयांच्या चार नोटा परत केल्या़ त्यानंतर उर्वरित नोटा परत करीत असताना त्यांना शेख याने दिलेल्या नोटेविषयी संशय आला़ त्यांनी शेखला नोट बनावट असल्याचे सांगताच तो पळत सुटला़ चौधरी यांनी आरडाओरडा केल्यावर आजूबाजूला असलेल्या लोकांनी पाठलाग करुन त्याला पकडले़ हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात दिले़ चौधरी यांच्याकडील एक आणि शेख याच्या कडील इतर ४ अशा ५०० रुपयांच्या ५ नोटा पोलिसांनी जप्त केल्या़ हिंजवडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत या नोटा दाखविल्या असता त्या बनावट असल्याचे तेथील मशीनवर तपासणीनंतर स्पष्ट झाले़ नाशिक येथील सिक्युरिटी प्रेस रिपार्ट येथे तपासणीसाठी या नोटा पाठविण्यात आल्या़ त्या बनावट असल्याचा अहवाल तेथून आला़ या खटल्यात सरकारी वकील विकास शहा यांनी ४ साक्षीदार तपासले़ सिक्युरिटी प्रेसचा अहवाल हा महत्वाचा पुरावा ठरला़ न्यायालयाने शेख याला दोषी ठरवत बनावट नोटा चलनात वापरणे या कलम ४८९ खाली ७ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंड तसेच बनावट नोटा बाळगण्याप्रकरणी ५ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़.