शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वीजताेडणी माेहीम राज्य शासनाचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:11 IST

इंदापूर: चालू वर्षी शेतकरी हे कोरोना, त्यानंतर झालेली तीव्र अतिवृष्टीत शेती नुकसानीत जाऊन आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांना ...

इंदापूर: चालू वर्षी शेतकरी हे कोरोना, त्यानंतर झालेली तीव्र अतिवृष्टीत शेती नुकसानीत जाऊन आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देणे आवश्यक असताना, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची वीजतोडणी मोहीम जुलमी पद्धतीने राबवित आहे. शेतकऱ्यांची वीजतोडणी मोहीम हे महाविकास आघाडी सरकार अपयश आहे, अशी टीका भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

सध्या इंदापूर तालुक्याचे काठावरती पास झालेले राज्यमंत्री हे विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहेत. मात्र, सध्याच्या वीज तोडणी मोहिमे संदर्भात सध्या एक शब्दही बोलत नाही. कोरोना, अतिवृष्टी तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजतोडणीमुळे शेतातील पिके जळून चालली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता महाआघाडी सरकारने तात्काळ शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली.

शेतीसाठी वीजपुरवठा महत्त्वाचा असल्याने माझ्या मंत्रिपदाच्या काळात वीज उपकेंद्राची मोठ्या संख्येने निर्मिती केली. तसेच माझ्या काळातील एकदाही शेतकऱ्यांची वीज तोडली नाही. मात्र आताच्या राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांवर वीजतोडीचे संकट टाकले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून चारा पिके, भाजीपाला पिके करपून चालली आहेत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

इंदापूर तालुक्यात सर्वाधिक वीज उपकेंद्रांचे जाळे

मी वीस वर्षे मंत्रिपदाच्या काळात काय केले असे विचारणार्‍या राज्यमंत्र्यांनी त्यांच्या काळात तालुक्यातील एक तरी वीज उपकेंद्र उभे केले का? उलट मी राज्यात सर्वाधिक वीज उपकेंद्रांचे जाळे इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण केले आहे. त्यामुळे गेली 25 वर्षात शेतीला पुरेशा दाबाने व नियमितपणे वीजपुरवठा होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात वाढते अपघात

गेल्या काही दिवसापासून बांधकाम राज्यमंत्र्यांच्या इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांच्या कामासंदर्भात ठेकेदारांनी साईड पट्ट्या न भरणे आदी रस्ता सुरक्षिततेच्या संदर्भात योग्य उपाययोजना न केल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याला जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करण्याची गरज आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

फोटो :-हर्षवर्धन पाटील