शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांपर्यंत पोहोचण्यात अपयशी

By admin | Updated: May 19, 2014 01:52 IST

प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या जोरदार प्रचार यंत्रणेसमोर आम आदमी पक्षाचे मारुती भापकर यांचा प्रचार फिका ठरला.

पिंपरी : प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या जोरदार प्रचार यंत्रणेसमोर आम आदमी पक्षाचे मारुती भापकर यांचा प्रचार फिका ठरला. भौगोलिक दृष्टा विस्तारलेल्या मावळ मतदार संघात सर्व मतदारांपर्यत पोहोचण्यात ते अपयशी ठरले. तसेच, दिल्ली विधानसभेच्या गोंधळामुळे डागाळलेल्या प्रतिमेमुळे पक्षाची जादू चालली नाही. परिणामी भापकर यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मावळात बलाढ्य समजल्या जाणार्‍या महायुतीचे श्रीरंग बारणे, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप, राष्टÑवादीचे राहुल नार्वेकर तसेच, बहुजन समाज पक्षाचे टेक्सास गायकवाड यांचे आव्हान होते. या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांच्या प्रचारासमोर भापकरांचा प्रचार खूपच मर्यादित होता. दिल्ली विधानसभेनंतर महाराष्ट्रातील ही पहिलीच निवडणूक होती. दिल्लीच्या विधानसभा गोंधळामुळे आपचे आकर्षण कमी झाले होते. अल्प काळात पक्षबांधणी न झाल्याची कमतरता त्यांना भासली. बोटावर मोजता येथील इतके कार्यकर्ते घेऊन त्यांना प्रचार यंत्रणा राबवावी लागली. त्यांचा भर पदयात्रा व रॅलीवर अधिक होता. आकारमानाने मावळचे क्षेत्र खूपच मोठे असल्याने सर्व भागांत भापकर पोहोचू शकले नाहीत. आपचा भ्रष्टाचाराचा मुद्दा मतदारांना भावला नाही. प्रचाराची सर्व धुरा सर्वस्वी भापकरांवर अवलंबून होती. सर्वसामान्यांच्या विविध जनआंदोलनात त्याचा सक्रिय सहभाग आहे. कामगार, शेतकरी वर्गात त्यांचा दांडगा संपर्क आहे. याच कार्याच्या बळावर ते रिंगणात उतरले होते. मात्र, त्याच्या ‘एकला चलो रे’ नीतीचा प्रभाव मतदारांवर फारसा पडला नाही. सर्वसामान्य वर्गातील असल्याने त्यांना आर्थिक गणिते सोडविता आली नाहीत. त्यामुळे खर्चाची मर्यादा होती. सुशिक्षित मतदार आपकडे वळेल असे म्हटले जात होते.(प्रतिनिधी)