शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

ससून रुग्णालयाला पर्याय देण्यास अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2015 00:00 IST

महाराष्ट्रात खासगी मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयांचे प्रस्थ वेगाने वाढत असतानाच दुसरीकडे शासकीय रुग्णालयांची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

पुणे : महाराष्ट्रात खासगी मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयांचे प्रस्थ वेगाने वाढत असतानाच दुसरीकडे शासकीय रुग्णालयांची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. राज्यशासनाचे मोठे रुग्णालय असलेल्या पुण्यातील ससूनच्या धर्तीवर राज्यात मोठी रुग्णालये उभारण्यात अजूनही राज्यशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे राज्यभरात मोफत उपचारांसाठी गरीब, मध्यमवर्गीय रुग्णांची फरपट होत आहे. त्यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रातूनच नव्हे, तर विविध भागांमधून रुग्ण ससूनमध्ये येत आहेत. ‘गरिबांचा वाली’ असे बिरुद मिरवणारे शासन खरोखरच सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी सक्षम सरकारी रुग्णालये कधी उभारणार, हा प्रश्न निर्माण होत आहे.आयटी, आॅटोमोबाईल, शिक्षण आदी क्षेत्रांत ‘नंबर वन’ असलेल्या महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्यसेवा मात्र दिवसेंदिवस खालावत चालल्याचे चित्र आहे. परकीय गुंतवणुकीसाठी राज्यशासनाकडून जेवढे प्रयत्न केले जात आहेत, तेवढे प्रयत्न सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी केले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आज राज्यात उपचारांअभावी मृत्यू होणाऱ्या गरीब रुग्णांची संख्या मोठी आहे.पुण्यात ससून हे एक मोठे रुग्णालय असून, तेथे विविध आजारांवर मोफत उपचार केले जातात. त्यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रातूनच नव्हे, तर ठाणे, गडचिरोली, नंदूरबार आदी आदिवासी जिल्ह्यांपासून इतर जिल्ह्यांमधील रुग्ण दररोज शेकडो किमीचा प्रवास करून ससूनमध्ये येतात. मात्र, ससूनची क्षमता मर्यादित असल्याने दररोज वाढत्या रुग्णसंख्येचा ताण ससूनवर येत आहे. (प्रतिनिधी)1रुग्णांचा हा लोंढा थोपविण्यासाठी वेळोवळी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ससूनसारखी मोठी रुग्णालये बांधण्याच्या घोषणा केल्या; मात्र त्या केवळ घोषणाच राहिल्या आहेत. 2काही जिल्ह्यांत अशी रुग्णालये उभे राहिलीसुद्धा. मात्र, या इमारतींमध्ये अत्याधुनिक मशिन्स, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची वानवा दिसून येत आहे. त्यामुळे या इमारती ‘पांढरा हत्ती’ ठरू लागल्या आहेत. 3जिल्ह्यात असलेली जिल्हा रुग्णालयांची अवस्थाही दयनीय आहे. अत्याधुनिकतेची, तज्ज्ञ-अनुभवी डॉक्टरांची, कर्मचाऱ्यांची वानवा हे या रुग्णालयांमधील वास्तव आहे. त्यामुळे मोफत उपचारासाठी आजही रुग्णांना ससून या शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय राहिलेला नाही.