शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीत बिघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात महाआघाडी असलेल्या सत्ताधारी पक्षांची जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र बिघाडी झाली आहे. ऐवढेच नाही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात महाआघाडी असलेल्या सत्ताधारी पक्षांची जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र बिघाडी झाली आहे. ऐवढेच नाही तर काही तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप- शिवसेना एकत्र आली आहे. दरम्यान सध्या पारंपारिक विरोधक म्हणून एकमेकांच्यात विरोधात उभे ठाकले असले तरी निवडणुकीनंतर काही ग्रामपंचायतीत महाआघाडी होऊ शकते.

जिल्हयातील ७४६ ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून, यातील ९५ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत ६५० ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. महाआघाडीत राज्याच्या सत्तेत असलेले मित्र पक्ष जिल्ह्यात एकमेकांचे पारंपारिक विरोधक आहेत. त्या स्थानिक पातळीवर पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक होणे गरजेचे असते, ही बाब लक्षात घेऊन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. यामुळेच महाआघाडीला विधानसभेत जमले पण ग्रामपंचायतीत बिघडले आहे .

चौकट

ग्रामपंचायतीत यंदाही ‘राष्ट्रवादी’ एक नंबरवर

“जिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. यंदाच्या निवडणुकीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर राहिली. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीत ‘राष्ट्रवादी’ स्वतंत्र लढत आहे, काही ठिकाणी आघाडी एकत्र आहे. निकालानंतर काही ठिकाणी महाआघाडी होऊ शकते.”

- प्रदीप गारटकर, जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

चौकट

ग्रामपंचायतीत पण महाआघाडी दिसेल

“राज्यात आम्ही तिन्ही मित्रपक्ष एक सरकार म्हणून एकत्र काम करत आहोत. ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या काही ठिकाणी महाआघाडीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. परंतु निवडणुकीनंतर अनेक ठिकाणी महाआघाडी झालेली दिसेल.”

-आमदार संजय जगताप, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष

चौकट

पक्ष टिकवण्यासाठी लढती आवश्यक

“ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक गावकी भावकीचे राजकारण महत्त्वाचे असते. त्यामुळे थेट पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका होत नसल्या तरी पक्षाचे अस्तित्वात टिकवण्यासाठी लढती आवश्यक आहे. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीनंतर महाआघाडी होऊ शकते.”

- रमेश कोंडे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष