शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोच्या जागेसाठी शासनाकडे डोळे

By admin | Updated: May 10, 2015 05:11 IST

राज्यातील जनतेला गतिमान शासनाचे आश्वासन देणाऱ्या भाजपा-युती सरकारला गेल्या चार महिन्यांत महापालिकेच्या नवीन कचरा डेपोसाठी

पुणे : राज्यातील जनतेला गतिमान शासनाचे आश्वासन देणाऱ्या भाजपा-युती सरकारला गेल्या चार महिन्यांत महापालिकेच्या नवीन कचरा डेपोसाठी जागा देण्यास वेळ मिळालेला नाही. विशेष म्हणजे याच शासनाकडून केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजना राबविण्यात येणार असून, या योजनेचा प्रमुख उद्देश घनकचरा व्यवस्थापन असून, त्यासाठीची बैठक बोलविण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकेस नुकतेच दिले आहेत. महापालिकेकडून शहरात निर्माण होणारा कचरा उरुळी देवाची येथील कचरा डेपोवर टाकला जातो. मात्र, या गावांमधील नागरिकांकडून या डेपोस विरोध असल्याने हा डेपो बंद करण्यासाठी महापालिकेस पर्यायी जागा देण्याचे आश्वासन चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामस्थांना दिले आहे. त्यासाठी ग्रामस्थांनीही नऊ महिन्यांची मुदत दिली असली, तरी सहा महिन्यांत नवीन जागा व प्रकल्प न उभारल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनास चार महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी, महापालिकेने जागांसाठी शासनाकडे पाठविलेली फाईल लालफितीच्या कारभारातच अडकली आहे. राज्य शासनाच्या महसूल, वन विभागांमध्येच ही फाईल फिरत असल्याने या जागा दोन महिन्यांत पालिकेस मिळण्याबाबत साशंकता आहे.