शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी आरोपींच्या कोठडीत २१ मेपर्यंत वाढ

By admin | Updated: May 20, 2014 04:35 IST

दांडेकर पुलाजवळील राजीव गांधीनगर येथे तरुणाच्या खून प्रकरणात आणखी साथीदारांचा सहभाग असून, नेमक्या कोणत्या कारणासाठी खून केला,

पुणे : दांडेकर पुलाजवळील राजीव गांधीनगर येथे तरुणाच्या खून प्रकरणात आणखी साथीदारांचा सहभाग असून, नेमक्या कोणत्या कारणासाठी खून केला, याचा उलगडा करण्यासाठी न्यायालयाने सहा आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यु. एल. पाठक यांनी आरोपींना २१ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. संतोष ऊर्फ बाबू मारुती पातेरे (वय ३९), संतोष ऊर्फ भावड्या बाळासाहेब साळुंखे (वय २१), सत्यजित ऊर्फ न्यानू प्रकाश गायकवाड (वय २१ ), राजू पोपट मोहिते (वय ३२), नितीन विष्णू मानकर (वय ३७), गणेश रमेश कोळकर (वय २५, सर्व रा. पर्वती पायथा, सिंहगड रस्ता) अशी आरोपींची नावे आहेत. सागर राजू वाघमारे (वय २६, रा. दत्तवाडी) याचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला होता. नंदा साळुंके यांनी फिर्याद दिली आहे. नंदा साळुंके यांचा मुलगा धनराज आणि त्याचा मित्र सागर वाघमारे हे दोघेही येथील घाटावर गप्पा मारत होते. त्या वेळी आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला केला. या घटनेमध्ये धनराज व त्याची बहीण स्वाती हेही गंभीर जखमी झाले होते. आरोपींची सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींकडे आणखी हत्यारे असण्याची शक्यता आहे. गुन्हा करण्यामागे कोण आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे कोणी पुरवली, कोणाकडून विकत घेतली, याबाबत तपास करण्यासाठी पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अशोक जाधव यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरला.