शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

साडेतीन हजार टन द्राक्षे निर्यात, द्राक्षांची वाढती मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 02:43 IST

जुन्नर विभागातील द्राक्षबागा ९० टक्के संपल्या असून आजअखेरीस ३,४०० टनांहून अधिक द्राक्ष निर्यात झाल्याची माहिती कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी तात्यासाहेब कोळेकर यांनी दिली.

वडगाव कांदळी  - जुन्नर विभागातील द्राक्षबागा ९० टक्के संपल्या असून आजअखेरीस ३,४०० टनांहून अधिक द्राक्ष निर्यात झाल्याची माहिती कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी तात्यासाहेब कोळेकर यांनी दिली.या वर्षी डिसेंबरपासून हंगामाला सुरुवात झाली असून, २२० कंटेनर युरोपीयन युनियन आणि आशियाई देशांमध्ये आयएफसी ओव्हरसीज (डी जे एक्सपोर्ट) कंपनीमार्फत निर्यात केले आहे. जुन्नर, आंबेगाव तालुक्यात १००० हेक्टरहून अधिक द्राक्षाचे क्षेत्र असून द्राक्ष निर्यातीच्या माध्यमातून ३०६ कोटी रुपये तालुक्यात आले आहेत. जागतिक बाजारपेठेत जंबो, शरद सीडलेस, नाना पर्पल, थॉमसन आणि सोनाका यासारख्या सफेत रंगाच्या द्राक्षांना परदेशात मोठी मागणी आहे. आयएफसी ओव्हरसीजचे व्यवस्थापक बिजो जोसेफ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की या वर्षी नारायणगाव परिसरामधून २२० हून अधिक कंटेनर युरोप, चीन, श्रीलंका, भूतान, थायलंड यासारख्या देशांत निर्यात केले असून, १०० कंटेनर हे भारतीय बाजारपेठेत पाठविले आहे. या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला बाजारभाव चढे होते; परंतु मधल्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात आलेली मंदी आणि चिली येथून आलेल्या द्राक्षांमुळे बाजारभाव ७० रुपयांपर्यंत खाली आले.या वर्षी किमान ७० ते कमाल ११० रुपये, तर सरासरी रुपये ९० ते ९५ इतका बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळाला आहे. सद्य:स्थितीत द्राक्षबागा ९० टक्के संपल्या असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत द्राक्षांची मागणी वाढत आहे. यामुळे बाजारभावात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा फायदा शेवटच्या टप्प्यात असलेल्या द्राक्ष बागायतदारांना नक्कीच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. द्राक्ष बागायतदार ऋषिकेश मेहेर, ऋतुपर्ण मेहेर, दिलीप वºहाडी म्हणाले, की या वर्षी ६० टक्के द्राक्षबागायतदारांनी मागील वर्षीच्या अनुभवानुसार मागणी आणि मिळालेला बाजारभावानुसार या वर्षी द्राक्ष छाटण्या आॅगस्ट- सप्टेंबरमध्ये घेतल्या; परंतु या वर्षी हवामानात झालेल्या बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाली.या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला बाजारभाव चढे होते; परंतु मधल्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात आलेली मंदी आणि चिली येथून आलेल्या द्राक्षांमुळे बाजारभाव ७० रुपयांपर्यंत खाली आले. या वर्षी किमान ७० ते कमाल ११० रुपये, तर सरासरी रुपये ९० ते ९५ इतका बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतमिळाला आहे.बाजारात असलेल्या मंदीचा फटका द्राक्षबागायतदारांना झाल्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. परंतु, द्राक्ष संशोधन केंद्र पुणे आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्याकडून वेळोवेळी मिळालेल्या योग्य मार्गदर्शनामुळे निश्चितच मोठे नुकसान टाळण्यात यशस्वी झालो, असेही त्यांनी नमूद केले.प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादनखर्च आणि मजूरटंचाईवर मात करून येथील जिद्दी द्राक्षबागायतदारांनी आधुनिक तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाच्या जोरावर द्राक्षांच्या गुणवत्तेमुळे जागतिक बाजारपेठेत जुन्नरच्या द्राक्षांची मागणी वाढताना दिसत आहे. यामुळे येत्या काळात द्राक्षशेतीला अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा शेतकरीवर्गाला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती