शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेडच्या पत्त्यावर पुन्हा स्फोटकांचे पार्सल

By admin | Updated: July 18, 2015 04:30 IST

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अजय भोसले यांच्या पाठोपाठ अरोरा टॉवरमधील एका उद्योजकाच्या कार्यालयामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्याध्यक्षांच्या नावाने दोन वायर

पुणे : संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अजय भोसले यांच्या पाठोपाठ अरोरा टॉवरमधील एका उद्योजकाच्या कार्यालयामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्याध्यक्षांच्या नावाने दोन वायर, केमिकल पावडर, बंदुकीतून उडालेली पुंगळी असे स्फोटक असलेले पार्सल पाठविण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एका पाठोपाठ येत असलेल्या स्फोटकांच्या पाकिटांमुळे खळबळ उडाली आहे.कॅम्प भागातील अरोरा टॉवरमध्ये उद्योजक सतीश चव्हाण यांचे कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयाच्या पत्त्यावर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांच्या नावाने खाकी रंगाचे पार्सल आले. चव्हाण यांच्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पाकीट उघडले. त्यामध्ये बंदुकीतून उडालेली पुंगळी, दोन वायर आणि पिवळसर रंगाची केमिकल पावडर आढळली. त्यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. बॉम्बशोधक पथकाने येऊन पाकिटाची तपासणी केली. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.चव्हाण मूळचे सांगली जिल्ह्यातील असून, पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा व्यवसाय आहे. ते संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत असतात. तसेच सांगलीमध्ये झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाला त्यांनी मदत केलेली होती. पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे, सहाय्यक आयुक्त आत्मचरण शिंदे, पोलिस निरीक्षक बरकत मुजावर यांनी चव्हाण यांच्या कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. आधीचे पार्सल सदाशिव पेठेतूनचार दिवसांपूर्वीच संभाजी ब्रिगेडच्या अजय भोसले यांना त्यांच्या जिजाई प्रकाशनच्या पत्त्यावर अशाच पद्धतीने स्फोटकांचे पार्सल पाठविण्यात आले होते. अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी या घटनेचा संबंध आहे का, कोणत्या उद्देशाने ही पार्सले पाठविली जात आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.

रस्त्यावर उतरून आंदोलन करूबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याला संभाजी ब्रिगेडकडून विरोध केला जात आहे. संभाजी ब्रिगेड पार्सलमध्ये स्फोटक पाठविण्याच्या धमक्यांना भिक घालणार नाही. परिवर्तनवादी संघटनांना सोबत घेऊन संभाजी ब्रिगेडकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.- संतोष शिंदे,जिल्हा कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड