बारामती : कृषी उद्योग मूलशिक्षण संस्थेची 73 एकर जागा ग्रामस्थांना अंधारात ठेवून घशात घालण्याच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रयत्नाविरुद्ध आज का:हाटीतील ग्रामसभेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विद्या प्रतिष्ठानला गावातून हद्दपार करण्याची मागणी करणा:या ग्रामस्थांनी सभेत माजी उपमुख्यमंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांचे नावही घेऊ देण्यास मज्जाव केला. कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद वाबळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विश्वासघात केला. ‘राजकीय दबावापुढे आपले चालले नाही’ अशी कबुली दिली. कायदेशीर लढाईसह सर्व प्रकारचा संघर्ष करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.
जिल्हाधिका:यांच्या आदेशाला विभागीय आयुक्तांकडून मनाई मिळविण्याच्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्याचबरोबर आयुक्तांनी कोणतीही सुनावणी घेतली नाही, तरीदेखील सचिव, विद्या प्रतिष्ठानच्या नावावर कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची 73 एकर जमीन करण्यात आली आहे. यामधील महसूल विभागातील अधिका:यांवरदेखील कारवाई करण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.
‘का:हाटीच्या संस्थेची 73 एकर जमीन पवारांच्या विद्या प्रतिष्ठानकडून हडप’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्याच्या पाश्र्वभूमीवर सुरू झालेली का:हाटीची ग्रामसभा आज संतप्त वातावरणातच सुरू झाली. कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेचे आणि विद्या प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष असलेल्या अजित पवार यांच्याविरुद्ध ग्रामस्थ प्रचंड संताप व्यक्त करत होते.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या संस्थेचे अध्यक्षपद या परिसरातील शैक्षणिक विकासासाठी दिले होते. त्यांनी फक्त संस्थेच्या भूखंडावर डोळा ठेवला. जमीन बळकावली. त्यामुळे या संस्थेला गावाबाहेर काढण्यासाठी सध्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.
ग्रामदैवत असलेल्या यशवंतराया मंदिराच्या सभामंडपात ग्रामसभा झाली. सरपंच सुरेखा खंडाळे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. उपसरपंच दीपाली लोणकर, सदस्य रूपाली लोणकर, सुरेखा जाधव, सुवर्णा भंडलकर, शारदा जाधव, खंडेराव जाधव, योगेश लोणकर या वेळी उपस्थित होते. ग्रामसेविका वैशाली पानसरे यांनी विषय पत्रिका वाचून दाखविली.
संस्थेची जमीन हडप करण्यासाठी अजित पवार यांच्याइतकेच गावातील संचालकही जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यावर बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अरविंदराव वाबळे म्हणाले, ‘‘अजित पवार यांनी फसवणूक केली आहे. सत्तेच्या जोरावर कायद्यात बदल केला. वन आणि महसूल अधिका:यांना हाताशी धरून 73 एकर 7 आर मोक्याच्या ठिकाणची जागा बळकावली आहे. विशेष म्हणजे जागेच्या सात बारा उता:यावर विद्या प्रतिष्ठान संस्थेची नोंद लावू नये, यासाठी हरकत घेतली होती. जमीन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आल्यावर गावक:यांचा विरोध असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणले. विभागीय आयुक्तांकडे या विरोधात दाद मागितली. त्यांचे उत्तर येईर्पयत जमिनीची नोंद लावू नये, अशी विनंती तहसीलदार, प्रांताधिका:यांना करण्यात आली. परंतु विभागीय आयुक्तांनी आम्ही दाखल केलेल्या अपिलावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.’’
बावळे म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ग्रामस्थांचा विरोध असेल, तर का:हाटीच्या संस्थेची जागा घेणार नाही, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते. त्यासाठी निवडणुकीत मतदान चांगले करा, अशी सूचना केली. त्यानुसार गावाने त्यांना भरभरून मते दिली. त्यांनी मात्र गावक:यांचा विश्वासघात केला.’’
संस्थेचे संस्थापक डॉ. अच्युतराव आगरकर आणि त्यांच्या पत्नीच्या त्यागामुळे या संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शाळांतील विद्यार्थी शिकले, मोठय़ा पदावर गेले. त्यांचा त्याग वाया जाऊ द्यायचा नाही. त्यामुळे त्यांनी मोठय़ा कष्टाने शासनाकडून मिळविलेली जमीन पुन्हा मिळवायचीच असा निर्धार करावा, असे मत सदाशिवराव खंडाळे यांनी मांडले. त्यावर तुळशीदास वाबळे यांनी जमीन परत मिळविण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल.
मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी येणारा खर्च करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थ धोंडीराम सोनवणो, सुदामराव लोणकर यांनी आगरकर बाबा व माताजी यांनी संस्था स्थापन केली नसती, तर गावातील अनेक पिढय़ा गुरांच्या मागे गेल्या असत्या. आगरकरांनी जमीन संस्थेला कायम कब्जे हक्काने मिळवली आहे. ग्रामस्थ संस्थेवर सभासद होण्यासाठी इच्छुक असताना त्यांना डावलण्यात येत आहे. यावर अरविंद वाबळे यांनी अजित पवार यांनी ते अध्यक्ष झाल्यावर नवीन सभासद करण्यास विरोध केला, असे सांगितले. (प्रतिनिधी)
अजित पवार पदावरून होणार दूर?
ग्रामसभेत कृषी उद्योग मूल संस्थेचे संचालक मंडळच बरखास्त करण्याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे संस्थेवर सध्या अध्यक्ष असलेल्या अजित पवार यांनादेखील पदावरून दूर व्हावे लागणार आहे. आता त्याची अंमलबजावणी कशी होणार, याकडे लक्ष लागले आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी या भागाचा विकास करावा, अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी विद्या प्रतिष्ठानचे हित पाहिले, असा सूर ग्रामस्थांचा होता. विद्या प्रतिष्ठानवर अजित पवार विश्वस्त आहेत.
राहुल जाधव, ग्रामपंचायत सदस्य रूपाली लोणकर, गणोश जाधव, बी. के. जाधव, महादेव खंडाळे, विश्वासराव चांदगुडे, गणोश वाबळे आदींनी या विषयावर चर्चा केली. अजित पवार यांच्या भूमिकेवर काहींनी सकारात्मक चर्चा करण्याचा प्रय} केला. तेव्हा त्यांनी फसवणूक केली आहे, त्यांचा फक्त संस्थेच्या जागेवर डोळा होता. त्यानुसार त्यांनी जमीन बळकावली आहे. त्यामुळे या प्रश्नी आता अजित पवार यांच्याशी चर्चाच करायची नाही, असा पवित्र ग्रामसभेत घेण्यात आला. त्यानंतर एका कार्यकत्र्याने त्याचा मुद्दा रेटण्याचा प्रय} केला. त्यावर गोंधळ झाला. ‘आगरकर बाबा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. सभेत तरुण कार्यकत्र्यानीदेखील आक्रमक भूमिका मांडली.
उच्च न्यायालयात दाद मागणार
कृषी उद्योग मूूल शिक्षण संस्थांची गेलेली जागा परत मिळवायची, संस्थेचे सध्याचे संचालक मंडळ बरखास्त करायचे, स्थानिकांना संचालक मंडळात स्थान द्यायचे, जागा परत मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागायची, असा ठराव करण्यात आला. ग्रामसेविका वैशाली पानसरे यांनी ठराव वाचून दाखवला. ठरावावर त्यानंतर मतदान घेण्यात आले. उपस्थित 1क्क् ग्रामस्थांनी हात उंचावून ठरावाला मंजुरी दिली. ठरावाची सूचना लक्ष्मण जाधव यांनी मांडली. अनुमोदन राजेश जाधव यांनी दिले. सर्व ग्रामस्थांनी ठरावाला मंजुरी दिली.
मी एकटा काय करणार?
संस्थेवर उपाध्यक्ष असतानादेखील राजकीय दबावापुढे आपले काही चालले नाही. संस्थेची जागा घेऊ नका म्हणून लेखी पत्र दिले. तहसीलदार, प्रांतांना नोंद लावू नका म्हणून निवेदने दिली. जिल्हाधिका:यांकडे दाद मागितली. पण ते सत्तेवर होते. एकटा मी काय करू शकणार?
- अरविंदराव वाबळे,
उपाध्यक्ष, कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था
‘लोकमत’ च्या वृत्तामुळे ग्रामसभेला शंभर टक्के उपस्थिती
‘का:हाटीच्या संस्थेची 73 एकर जागा पवारांच्या विद्या प्रतिष्ठानच्या घशात’ असे वृत्त आज ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. त्यामुळे ग्रामसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अशी प्रतिक्रिया कृषी उद्योग, मूल शिक्षण संस्थेच्या वसतिगृह विद्यालयाचे माजी शिक्षक त्र्यंबक चांदगुडे, द. रा. जाधव, विठ्ठल जाधव, कुंडलिक राऊत यांनी व्यक्त केली. ग्रामसभेला दवंडी दिली जाते. नोटीस काढली जाते. तरीदेखील कामाच्या व्यापामुळे ग्रामस्थांची उपस्थिती इतर ग्रामसभांना कमी असते. मात्र, गावच्या संस्थेची जागा गेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्याचबरोबर संताप आहे. ‘लोकमत’ने नेमका घडलेला प्रकार जनतेच्या पुढे आणला आहे. त्यामुळे जागा बळकाविण्याच्या प्रकाराला विरोध झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.