शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीत अदलाबदल

By admin | Updated: February 16, 2017 03:38 IST

महापालिका निवडणूक विभागाच्यावतीने मंगळवारी बूथनिहाय मतदार यादी जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी मतदारांच्या अदलाबदली

पुणे : महापालिका निवडणूक विभागाच्यावतीने मंगळवारी बूथनिहाय मतदार यादी जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी मतदारांच्या अदलाबदली झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींची पडताळणी करण्याचे काम निवडणूक विभागाकडून सुरू आहे. महापालिकेच्यावतीने ४१ प्रभागांमधील ३ हजार ४४२ मतदान केंद्रनिहाय मतदारांची यादी मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर केली. त्यामध्ये अनेक ठिकाणी मतदारांच्या नावांची अदलाबदल झाली असल्याचे लक्षात आले. भाजपाचे गटनेते गणेश बीडकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास दांगट यांनी बुधवारी सावरकर भवन येथील निवडणूक कार्यालयामध्ये धाव घेतली. ज्या मतदारांच्या नावांबाबत गोंधळ झाला आहे, त्याची यादी निवडणूक विभागाकडे देण्यात आले. शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी अशाप्रकारे गोंधळ झाला आहे. मतदारयादीची जबाबदारी देण्यात आलेले सुहास मापारी यांनी याबाबत सांगितले, ‘‘मतदार यादीतील गोंधळाबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्याची सहायक पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरू आहे.’’निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे, त्यामध्ये आता बदल होऊ शकणार नाही. मात्र, मतदान केंद्रांमध्ये बदल झाला असल्यास त्याबाबत निर्णय घेता येऊ शकेल.’’महापालिकेच्या ४१ प्रभागनिहाय मतदारांची प्रारूप मतदार यादी १२ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यावर १७ जानेवारीपर्यंत हरकती व तक्रारी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ९०९ तक्रारी निवडणूक विभागांकडे दाखल झाल्या होत्या. त्यानुसार मतदार यादीमध्ये बदल करण्यात आले होते. मात्र, तरीही अनेक प्रभागातील मतदारांची अदलाबदल कायम राहिली असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)