शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गसंवर्धनाच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हा : युवराज जेधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST

माळशिरस येथील किल्ले दौलतमंगळ येथे किल्ले दौलतमंगळ दुर्गसंवर्धन समितीच्या वतीने आयोजित दुर्गपूजेदरम्यान बोलत होते . गेल्या चोवीस वर्षांपासून शिवाजी ...

माळशिरस येथील किल्ले दौलतमंगळ येथे किल्ले दौलतमंगळ दुर्गसंवर्धन समितीच्या वतीने आयोजित दुर्गपूजेदरम्यान बोलत होते .

गेल्या चोवीस वर्षांपासून शिवाजी ट्रेल या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक गडकिल्ल्यावर दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी दुर्गपूजा केली जाते. यामुळे किल्ले दौलतमंगळ येथे किल्ले दौलतमंगळ दुर्गसंवर्धन परिवाराच्या वतीने दुर्गपूजा करण्यात आली. या वेळी सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक, वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज नीलेश देशपांडे, संदेश देशपांडे, सिनेअभिनेते सचिन गवळी यांच्या हस्ते गडाच्या पायथ्याला असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याचे पूजन करून दुर्गपूजा करण्यात आली. या वेळी शिवभक्त सचिन गवळी यांनी केलेल्या शिवगर्जनेने किल्ले दौलतमंगळचा परिसर दणाणून गेला होता. या वेळी शिवव्याख्याते तेजस टेंगले, युवराज राठोड, सह्याद्री फाउंडेशनचे प्रमोद उबाळे, किल्ले दौलतमंगळ दुर्गसंवर्धन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विनय गुरव, उपाध्यक्ष संजय यादव, कार्याध्यक्ष प्रवीण कामठे, दिगंबर यादव, अक्षय यादव, सिध्दार्थ गद्रे, राजाभाऊ भुसनर सर्व सदस्य उपस्थित होते .

मान्यवरांनी भारतीय पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहाय्यक पुणे मंडळाचे संरक्षक सहाय्यक गजानन मंडावरे यांच्यासोबत चर्चा करून किल्ले दौलतमंगळच्या संवर्धनासाठी काय उपाययोजना करता येतील याबद्दल चर्चा केली. किल्ले दौलतमंगळच्या दुर्गसंवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन या वेळी गजानन मंडावरे यांनी दिले.

फोटोओळ - माळशिरस (ता. पुरंदर) येथे किल्ले दौलतमंगळ येथे दुर्गपूजा करताना मान्यवर.