शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘अनलॉक’मध्येही शाळा लॉक, विद्यार्थी घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST

पुणे : कोरोना रुग्णसंख्या घटल्याने राज्य शासनाने अनलॉक अंतर्गत कोरोनाविषयक निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. परंतु, शाळा बंदच ...

पुणे : कोरोना रुग्णसंख्या घटल्याने राज्य शासनाने अनलॉक अंतर्गत कोरोनाविषयक निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. परंतु, शाळा बंदच ठेवल्या असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. अनलॉकमध्ये शाळा बंद, विद्यार्थी घरी अशी स्थिती असली तरी शिक्षकांसाठी मात्र शाळा सुरू होणार आहेत. ऑफलाइन शाळा सुरू करण्याबाबत शासनाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.

शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले असून इयत्ता पहिली ते बारावीच्या किती टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे स्पष्ट आदेश राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत.

सध्या इंग्रजी माध्यमाच्या खासगी विनाअनुदानित शाळा पालकांकडून शुल्क आकारून आपला खर्च भागवत आहेत. मात्र अनुदानित शाळांची अवस्था चिंताजनक आहे. त्यामुळे शासनाने ऑनलाइन शिक्षण सुरू असताना व ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू होण्यापूर्वी या शाळांना आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा शिक्षण संचालकांकडून केली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शाळा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.

चौकट

गुरुजींचीच शाळा सुरू होणार

विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश कधी मिळणार, याबाबत कोणत्याही सूचना दिली नाहीत. परंतु, इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या पन्नास टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांनासुद्धा शाळेत शंभर टक्के उपस्थिती राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

चौकट

गेल्या काही वर्षांपासून शासनाने अनुदानित शाळांना वेतनाव्यतिरिक्त इतर कोणतेही अनुदान दिले नाही. तसेच सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागेवर नवीन शिक्षक नियुक्त करण्यास परवानगी मिळत नाही. त्यामुळे सध्या अनुदानित शाळा अडचणीत आल्या आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन देणे, ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक सॉफ्टवेअर खरेदी करणे आदीसाठी शासनाने या शाळांना मदत करावी, अशी सर्व संस्थाचालकांची अपेक्षा आहे. विनाअनुदानित शाळा पालकांकडून शुल्क आकारून आपला खर्च भागवण्याचा प्रयत्न करत आहेत.

-अ‍ॅड. एस. के. जैन, अध्यक्ष, नियामक मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळी

चौकट

“ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. मात्र, ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांना सध्या केवळ ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत.”

-स्मिता गौड, प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे