शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

चित्र काढले तरी भावना दुखावतात

By admin | Updated: May 6, 2017 02:38 IST

‘व्यंगचित्र या माध्यमाची रसिकांना जाण होणे आवश्यक आहे. पण सध्या चित्र काढायचे म्हटले तरी भावना दुखावल्या जातील, याची

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘व्यंगचित्र या माध्यमाची रसिकांना जाण होणे आवश्यक आहे. पण सध्या चित्र काढायचे म्हटले तरी भावना दुखावल्या जातील, याची भीती वाटते. बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रांतून अनेक नेत्यांवर आसूड ओढले. पण त्या वेळी कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत. व्यंगचित्राच्या माध्यमातून अशीच निकोप रसिक भावना विकसित व्हायला हवी,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी शुक्रवारी व्यक्त केली.जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त कार्टुनिस्ट कंम्बाइन व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, व्यंगचित्रकार चारुहास पंडित आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला सनईवादक नसल्याचे पाहून फडणीस यांनी सनईवादकाचे व्यंगचित्र रेखाटले. त्याचवेळी सनईचे रेकॉर्डींग वाजविण्यात आले. यावर फडणीस यांनी चित्रालाही सूर आल्याची टिप्पणी केली. व्यंगचित्रकार भटू बागले यांनी या वेळी गोगावले यांचे व्यंगचित्र रेखाटून त्यांना भेट दिले.फडणीस म्हणाले, ‘‘व्यंगचित्रासाठी मला शब्द वापरण्याची कधी गरज पडली नाही. व्यंगचित्र हे माध्यम चित्रकलेतूनच पुढे आले आहे. सर्व प्रकारचे विचार व्यक्त करण्याचे सामर्थ्य त्यात आहे. केवळ राजकीय टीकाचित्र म्हणजे व्यंगचित्र नाही. निखळ आनंद देणारे प्रबोधनपर करणारे चित्र म्हणजे व्यंगचित्र. या माध्यमाची रसिकांना जाण होण्याची गरज आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून निकोप रसिक भावना विकसित व्हायला हवी. त्यादृष्टीने व्यंगचित्राचे शैक्षणिक मूल्य  मोठे आहे. ज्ञानशाखा आधी आल्या  व त्यानंतर महाविद्यालये, विद्यापीठे आली. त्यामुळे आज ना उद्या यामध्ये व्यंगचित्र कलेची दखल घ्यावीच लागेल, असे फडणीस यांनी नमूद केले.उद्घाटनानंतर चारुहास पंडित, घनश्याम देशमुख, विवेक प्रभुकेळुस्कर आणि वैजनाथ दुलंगे यांनी व्यंगचित्रांच्या विविध प्रकारांवर सचित्र मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थितांनीही आपली व्यंगचित्र काढून घेण्याचा आनंद लुटला.