शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीत प्रवेश मिळूनही १४ हजार विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:20 IST

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, मंगळवारी रात्री ...

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, मंगळवारी रात्री आठवाजेपर्यंत एकूण ३० हजार ८१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. अकरावी प्रवेशाची पहिली फेरी संपली असून, या फेरीतून २४ हजार ६५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. प्रवेश मिळूनही तब्बल १४ हजार ४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याचे दिसून येत आहे.

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश फेरी राबविली जात आहे. पहिल्या फेरीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३८ हजार ७९६ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे अलाॅटमेंट करण्यात आले होते. मात्र, त्यातील केवळ २४ हजार ६५७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. इतर काही विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कोटा, इन हाऊस कोटा व अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश घेतला आहे.त्यामुळे एकूण प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३० हजारांहून अधिक आहे.

शिक्षण विभागातर्फे पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ३११ कनिष्ठ महाविद्यालयांतील जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार होती. परंतु, प्रवेशप्रक्रियेतील तीन महाविद्यालये कमी झाले आहेत. त्यामुळे आता ३०८ महाविद्यालयांतील १ लाख १० हजार ७२५ जागांवर प्रवेश राबविले जाणार आहेत. या जागांवर काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यामुळे आता प्रवेशासाठी ७९ हजार ९०९ जागा उरल्या आहेत.

-----------

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतून पहिला पसंतीक्रमानुसार २२ हजार ६६५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यातील १८ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र,४ हजार १६२ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील दोन फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही.