शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई मिटविण्यासाठी जिल्ह्यात ४२ कोटी ८७ लाखांना मंजुरी

By admin | Updated: September 29, 2015 02:21 IST

जलयुक्त शिवार योजनेमुळे यंदा दुष्काळी परिस्थितीतही काहीसा दिलासा मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत यंदा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीदार करण्यासाठी

पुणे : जलयुक्त शिवार योजनेमुळे यंदा दुष्काळी परिस्थितीतही काहीसा दिलासा मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत यंदा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीदार करण्यासाठी येत्या वर्षांत ४२ कोटी ८७ लाखांची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. यात आंबेगाव तालुक्याला सर्वाधिक निधी, तर दौंड तालुक्यात सर्वाधिक कामे होणार आहेत.या वर्षी जूनची सरासरी ओलांडल्यानंतर पावसाने दोन महिने दडी मारली होती. त्यामुळे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली होती. श्रावण महिन्यातही ४९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा चांगला पाऊस झाला. हा पाऊस प्राधान्याने जलयुक्तची ज्या भागात कामे सुरू आहेत त्या परिसरात झाल्याने येथे चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या परिसराला काहीसा दिलासा मिळाला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागामार्फत २0१५-१६ या वर्षासाठी ४२ कोटी ८७ लाखांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यातून को.प. बंधारे, साठवण बंधारे, वळण बंधारे, पाझर तलाव तसेच दुरुस्तीची कामे घेतली जाणार आहेत. यात ४0१.२५ लाखांचा सर्वाधिक निधी हा आंबेगाव तालुक्याला मिळाला असून, यातून १८ कामे हाती घेण्यात येणार आहेत. तर, सर्वांत कमी ११६.६२ लाखांचा निधी वेल्हे तालुक्याला मिळाला असून, ६ कामे घेण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी जिल्हा परिषदेमार्फत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सुमारे ३ कोटी ९४ लाखांची कामे केली आहेत. जी गावे टंचाईग्रस्त आहेत, त्या गावांना जादाचा निधी देण्यात आला असून, तेथे नवीन कामे व पूर्वीच्या कामांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामांमुळे त्या भागातील भूजलाची पाण्याची पातळी वाढून तेथील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याचे कंद यांनी सांगितले.