पुणो : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया येत्या 5 जुलैपासून सुरू होणार आहे. मागील वर्षीप्रमाणोच या वेळी ऑनलाईन पद्धतीनेच ही प्रक्रिया राबविली जाणार असून, राज्यात सुमारे 1 लाख जागा प्रवेशासाठी उपलब्ध असतील.
दहावी व बारावीचा निकाल लागूनही ‘आयटीआय’च्या प्रवेशप्रक्रियेबाबत कोणतेही संकेत मिळत नसल्याने विद्याथ्र्यामध्ये गोंधळाची स्थिती होती. मागील वर्षीपासून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत आणि रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहकार्याने राज्यातील ‘आयटीआय’ची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली. या वेळी मात्र प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी संचालनालयाने स्वतंत्रपणो ही प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, प्रक्रियेतील त्रुटी दूर करून ती सुलभ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यासाठी थोडा उशीर झाल्याचे विभागीय सहायक संचालक एम. एम. मोरे यांनी सांगितले.
राज्यात सुमारे 417 शासकीय ‘आयटीआय’ असून, त्यामध्ये सुमारे 99 हजार जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 5 जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक आज (शनिवारी) जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. पुणो विभागात 61 संस्थांमध्ये सुमारे 18 हजार जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जाईल.
खासगी आयटीआयचे प्रवेश संस्था स्तरावर दिले जातील. मागील वर्षी अर्ज भरताना विद्याथ्र्याची रोजगार व स्वयंरोजगार विभागात थेट नोंदणी होत होती. त्यामध्ये वेळ जात होता. तसेच काही त्रुटीही होत्या. आता ही नोंदणी होणार नाही. त्यामुळे अर्ज भरताना वेळ कमी लागेल. प्रवेशाबाबतची सर्व माहिती संकेतस्थळावरही मिळू शकेल, असे मोरे म्हणाले. (प्रतिनिधी)
माहितीत
बदल करता येणार
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर पूर्वी त्यात बदल करणो शक्य होत नव्हते. या वेळी मात्र विद्याथ्र्याना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज भरण्याच्या कालावधीत विद्याथ्र्याना आवश्यक वाटल्यास भरलेल्या अर्जामध्ये बदल करणो शक्य होणार आहे. त्यामुळे विद्याथ्र्याच्या अर्जामध्ये होणा:या चुका राहणार नाहीत. संकेतस्थळ - 666.5िी3.ॅ5.्रल्ल