शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक रवींद्र सांकला यांना मागितली ५० लाखांची खंडणी अन् बळकाविला फ्लॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : व्यावसायिक प्रकल्पातील एक ऑफिस मोफत द्या किंवा ५० लाख रुपये खंडणी मागून ती न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : व्यावसायिक प्रकल्पातील एक ऑफिस मोफत द्या किंवा ५० लाख रुपये खंडणी मागून ती न दिल्यास बदनामी करुन वाट लावून टाकीन अशी धमकी प्रसिद्ध उद्योजकाला देत जबरदस्तीने फ्लॅटचा ताबा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी उद्योजक रवींद्र नौपतलाल सांकला (वय ५९, रा. आर एन एस बंगलो, ॲॅलेक्झांड्रा रोड, कॅन्टोन्मेंट) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल बजाज (रा. डेक्कन जिमखाना) आणि बापू गोरख शिंदे (रा. मानाजीनगर, नऱ्हे रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०१९ ते १६ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला आहे.

राजेश बजाज हा स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणवून घेतो. रवींद्र सांकला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजेश बजाज याने वकिलीची सनद नसताना बनावट ओळखपत्र तयार करुन सांकला यांचे वकीलपत्र पीएमसी येथील दिवाणी न्यायालयात दाखल केले़ त्यांच्याकडून ९ लाख ९० हजार रुपये वकिली शुल्क म्हणून घेऊन त्यांचा विश्वासघात केला. तसेच बेकायदेशीरपणे सांकला यांच्या फ्लॅटचा जबरदस्तीने ताबा घेऊन आपले सामान फ्लॅटमध्ये ठेवले. बापू शिंदे याने ‘९३ एव्हेन्यू’ या व्यावसायिक प्रकल्पातील एक ऑफिस मोफत द्या किंवा रोख ५० लाख रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास वानवडी येथील प्रकल्प बेकायदेशीरपणे बांधला असल्याची तक्रार पोलीस व इतर ठिकाणी करुन तुमची बदनामी करुन वाट लावून टाकीन. तुम्हास संपवून टाकेन अशी धमकी दिली.

राजेश बजाज याने अनेकांची यापूर्वी बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्याविरुद्ध माहिती अधिकार कायद्याखाली कागदपत्रे मागवून त्याद्वारे बदनामी केल्याबद्दल राजेश बजाज याच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला आहे. बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांनी फसवणूक केल्याचा दावा करीत राजेश बजाज यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांच्या फिर्यादीवरुन राजेश बजाज याला गुन्हे शाखेने ऑक्टोबर २०१७ मध्ये अटक केली होती.