शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

मताचा टक्का वाढविण्यावर असेल प्रशासनाचा भर

By admin | Updated: September 16, 2014 00:21 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत मताचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन मोहीम हाती घेणार आहे.

पुणो : आगामी विधानसभा निवडणुकीत मताचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन मोहीम हाती घेणार आहे. पथनाटय़, जाहिराती, तसेच शाळा-महाविद्यालये व कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मतदानाचे महत्त्व सांगण्यात येणार आहे. 
लोकसभा निवडणुकीवेळी जिल्हा प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले होते. त्यानंतर लोकसभेत मतदानाची टक्केवारी 57 टक्क्यांवर पोचली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांर्पयत पोहोचण्यासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांची आखणी करण्यास सुरुवात केली आहे.  पुण्यात युवकवर्ग मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यांच्यापयर्ंत पोहोचण्यासाठी विविध शिक्षण संस्थांतून मतदार जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
या विषयी माहिती देताना अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील म्हणाले, की मतदार नावनोंदणी मोहिमेनंतर आता मताची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचीदेखील मदत घेतली 
जाईल. 
दरम्यान, सोमवारी निवडणूक  तयारीसाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय अधिकारी व शाखाप्रमुखांची बैठक झाली. त्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकर, उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, नीलिमा धायगुडे, अस्मिता मोरे, विजया पांगारकर, सीमा होळकर, सार्वजनिक बांधकाम व पोलीस विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. यात निवडणूक तयारीविषयी 19 विषय होते. यात अधिका:यांना नियोजनाच्या विविध जबाबदा:यादेखील देण्यात आल्या. (प्रतिनिधी)
 
शाखाप्रमुखांनी त्यांच्या हद्दीतील राजकीय फलक, बॅनर्स उतरवून, त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे व आचारसंहिता कक्षाकडे सादर करावा. तसेच, निवडणूक कामकाजासाठी आवश्यक समित्यांची नियुक्ती करावी. निवडणुकीसाठी सभा, प्रचार वाहन परवाना अशा विविध प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी विधानसभानिहाय एक खिडकी योजना सुरु करण्याची सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली.