शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांचे पदपथांवर अतिक्रमण

By admin | Updated: September 30, 2015 01:07 IST

डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, गुरुद्वारा चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर आदी भागांतील पदपथांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक

अतुल क्षीरसागर, रावेतडॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, गुरुद्वारा चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर आदी भागांतील पदपथांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. परिसराचा विकास करीत असताना पालिकेने लाखो रुपये खर्च करून सुसज्ज रस्ते निर्माण केले. रस्त्यालगत पेव्हिंग ब्लॉक टाकून मोठे पदपथ तयार करण्यात आले. सुरुवातीचे काही दिवस याचा वापर नागरिक, विद्यार्थी करत असताना दिसून आले. परंतु, पदपथाच्या बाजूला असणाऱ्या विविध व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायातील विक्रीच्या वस्तू पदपथावर मांडण्यास सुरुवात केली. हळूहळू पूर्णपणे अतिक्रमण करून पदपथ व्यापून टाकला. बिजलीनगर येथील रेल विहार चौक ते ओम चौकापर्यंत दोन्ही बाजंूनी भंगार, हॉटेल, गॅरेज, भाजीविक्रेते, कापड विक्रेते, विविध हातगाडे आदींनी पदपथावर व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे पदपथ नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी, असा प्रश्न नागरिकांना पडतो. या मार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदपथाऐवजी रस्त्याने जीव मुठीत घेऊन जावे लागते. गुरुद्वारा परिसरात तर अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय चक्क रस्त्यावरच मांडतात. या ठिकाणी नेहमी वाहतूककोंडी होते. डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलासमोर दोन्ही बाजूंनी असणाऱ्या पदपथावर ज्यूस सेंटर, दूध विक्रेते, स्नॅक्स विक्रेते, फळ विक्रेते यांनी पूर्ण पदपथ व्यापला आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी अनेक शाखांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यामुळे परिसरात सतत विद्यार्थी आणि नागरिकांची गर्दी नेहमी असते. व्यावसायिकांनी आपली दुकाने पदपथावर थाटल्यामुळे सर्वांना नाइलाजास्तव रस्त्यानेच जावे लागते. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे नागरिकांनी अशा व्यावसायिकांबद्दल अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा संबंधित प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेते. त्यामुळे या सर्व व्यावसायिकांचे फावते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी, संबंधित विभागाने अशा व्यावसायिकांच्या विरोधात कडक कारवाई करून नागरिकांच्या वापरासाठी पदपथ मोकळे करावेत, अशी मागणी विद्यार्थी, नागरिक करीत आहेत. वाल्हेकरवाडी शिवाजी चौक, गुरुद्वारा चौक, बिजलीनगर, स्पाइन रोड, अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे.