शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाच्या दंडात दहा पट वाढ

By admin | Updated: June 22, 2017 07:15 IST

शहरातील रस्ते, पदपथावरील वाढत्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमणाच्या दंडापोटी घेतल्या जाणाऱ्या रकमेत ५०० रुपयांवरून थेट

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरातील रस्ते, पदपथावरील वाढत्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमणाच्या दंडापोटी घेतल्या जाणाऱ्या रकमेत ५०० रुपयांवरून थेट ५ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वारंवार अतिक्रमणविरोधी कारवाई करूनही पुन:पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण होत असल्याने दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील अतिक्रमणांवर प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याची ओरड नगरसेवकांकडून मुख्य सभेत वारंवार केली जाते. त्याच वेळी अतिक्रमण कारवाई करायला गेलो असताना नगरसेवकांकडून ती रोखली जाते, अतिक्रमणांविरुद्ध कारवाई करू नये म्हणून दबाव टाकला जातो, असे प्रशासनाकडून सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर, अतिक्रमणाच्या विळख्यातून शहराची मुक्तता करण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.अतिक्रमणाविरोधातील कारवाईसाठी महापालिकेला परिमंडळनिहाय दररोज ६० हजार रुपये खर्च येतो. मात्र, दंडाची रक्कम अत्यल्प असल्याने कारवाईसाठी होणारा खर्चही वसूल होत नाही. तसेच, अनधिकृत व्यावसायिक दंडाची रक्कम भरून पुन:पुन्हा अतिक्रण करीत असल्याचे प्रशासनाच्या निर्दशनास आले आहे. त्यामुळे अतिक्रमणे होऊ नये, तसेच त्या कारवाईसाठीचा खर्च वसूल व्हावा, यासाठी दंडाच्या रकमेत दहा पटींनी वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीत मान्यता देण्यात आली.अतिक्रमण दरवाढीच्या निर्णयाला आता मुख्य सभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. मुख्य सभेच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी होईल.