शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण करून बुजवला ओढा

By admin | Updated: May 24, 2016 05:49 IST

लामजेवाडी-शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील आंबरहोळ परिसरातील गट क्र. ७० लगतच्या ओढ्यावर परिसरातील शेतकऱ्याने अतिक्रमण करून ओढाच बुजवला आहे.

बारामती : लामजेवाडी-शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील आंबरहोळ परिसरातील गट क्र. ७० लगतच्या ओढ्यावर परिसरातील शेतकऱ्याने अतिक्रमण करून ओढाच बुजवला आहे. याबाबत इंदापूरच्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. एकीकडे शासन ओढा खोलीकरणाची आणि विस्तारीकरणाची कामे हाती घेत आहे. जलयुक्त शिवार हा राज्यशासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पदेखील यावरच आधारित आहे. परंतु लामजेवाडी येथील धनदांडग्या शेतकऱ्याने थेट ओढाच बुजवल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत येथील रहिवासी बळवंत बयाजी सूर्यवंशी यांनी प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्याकडे तक्रार दिली आहे. सूर्यवंशी यांच्या शेतालगतच हा ओढा आहे. या ओढ्याला पावसाळ्यात मुबलक पाणी असते. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळीही चांगली राहते. मात्र, येथील एका शेतकऱ्याने सूर्यवंशी बाहेरगावी गेले असता हा ओढा माती व दगड टाकून बुजवला आहे. सुमारे ४२५ फूट लांबीचा ओढा या शेतकऱ्याने बुजवला आहे. याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या सूर्यवंशी यांनाच दमदाटी करण्यात आली. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओढ्याला पाणी आल्यास परिसरातील शेतीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, ओढ्याचा नैसर्गिक प्रवाहच रोखल्याने शेती वाहून जाण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन या शेतकऱ्यावर तातडीने कारवाई करून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह खुला करण्याची मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)