शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

By admin | Updated: October 10, 2016 02:39 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा क्विक हिल अ‍ॅकॅडमी इन्स्टिट्यूट या आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबरच केपीआयटी टेक्नॉलॉजीबरोबर नुकताच शैक्षणिक करार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा क्विक हिल अ‍ॅकॅडमी इन्स्टिट्यूट या आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबरच केपीआयटी टेक्नॉलॉजीबरोबर नुकताच शैक्षणिक करार झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एमटेक इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आणि आॅटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी हे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या युगाशी सुसंगत अशा रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत, असे विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गेल्या वर्षात जर्मनी, नॉर्वेसारख्या देशातील नामांकित विद्यापीठांबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण शैक्षणिक करार झाले आहेत. विद्यापीठाच्या विद्यार्थी व शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी परदेशातील विद्यापीठांबरोबर ५५ हून अधिक करार झाले आहेत. त्याचबरोबर विविध औद्योगिक कंपन्यांनी विद्यापीठाबरोबर करार करून नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत.डॉ. गायकवाड म्हणाले, की माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच गोष्टी आॅनलाइन होत आहेत. डिजिटल इंडिया, मेक इन इंडियासारख्या उपक्रमांमुळे त्यात वाढ होणार असल्याने सायबर सिक्युरिटीची अधिक आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने क्विक हिल या आंतरराष्ट्रीय कंपनीबरोबर करार करून सायबर सिक्युरिटीसाठी आवश्यक अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एमटेक इन्फॉर्मेशन सिक्युरिटी’ असे या नव्या अभ्यासक्रमाचे नाव असेल. त्याचबरोबर पुणे परिसरात अनेक आॅटोमोबाईल कंपन्या असून, गेल्या काही कालावधीपासून चारचाकी वाहनांमध्ये संगणकाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे विद्यापीठाने केपीआयटी टेक्नॉलॉजीबरोबर करार करून आॅटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यापीठातर्फे नेहमीच कालसुसंगत अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला जात असून, त्यात प्रोग्राम इन मेडिशनल केमिस्ट्री, बीएस्सी.बीएड. आदी अभ्यासक्रमांची उदाहरणे देता येतील, असे नमूद करून गायकवाड म्हणाले, की संशोधनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि सुसज्ज ग्रंथालये उभी केली जात आहेत. गेल्या काही वर्षांत विद्यापीठाने शैक्षणिक कामांसाठी विविध संस्थांकडून सुमारे ४०० कोटी रुपयांचा निधी मिळविला आहेत. त्यात विद्यापीठाला युनिव्हर्सिटी पोटेन्शियल फॉर एक्सलन्स (यूपीई), डीएसटीकडून अनुक्रमे ५० कोटी व ३१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त झालेल्या ३६ कोटी निधीतून १० कोटी रुपये विद्यापीठात संशोधन करणाऱ्या एम.फिल., पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जात आहे. केवळ आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाच नाही तर गुणवंत विद्यार्थ्यांसाठी चार प्रकारच्या शिष्यवृत्ती सुरू करण्यात आल्या असून, अनेक विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. विद्यापीठाला नाशिक व अहमदनगर येथे विस्तार वाढविण्यासाठी जमीन प्राप्त झाली असून, येथेही पुढील काळात नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठाने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठीही योजना राबविल्या.