शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वर्गीकरणास कर्मचाऱ्यांचा नकार

By admin | Updated: February 17, 2015 23:44 IST

पालिकेने नागरिकांकडून कचरा वर्गीकरण करून घेणे आवश्यक असताना, कर्मचाऱ्यांना वर्गीकरण करणे बंधनकारक करणे चुकीचे आहे.

पुणे : पालिकेने नागरिकांकडून कचरा वर्गीकरण करून घेणे आवश्यक असताना, कर्मचाऱ्यांना वर्गीकरण करणे बंधनकारक करणे चुकीचे आहे. त्यामुळे कचरा संकलन करण्याची भूमिका घेत भवानी पेठ व घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांनी वर्गीकरणास नकार दिला आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात कचरा वर्गीकरणाची समस्या निर्माण झाली असून, या कामासाठी ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली. तसेच, याबाबत चर्चा सुरू असून, लवकरच तोडगा काढला जाईल, असे जगताप यांनी स्पष्ट केले.कचरा आंदोलनानंतर पालिकेने शहरात कचरावर्गीकरण सक्तीचे केले आहे. मात्र, नागरिकांकडून ते केले जात नसल्याने ही जबाबदारी कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांकडे पुरेशी साधनसामग्री नसल्याने वर्गीकरण करताना या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडील सुमारे तीनशेंहून अधिक कर्मचाऱ्यांनी वर्गीकरणास नकार देत केवळ संकलन करण्याची भूमिका घेतली आहे. तर, घोले-रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडीलही ६० ते ७० कर्मचाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या १० ते १२ प्रभागांत कचरासमस्या गंभीर बनली असून, सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ही समस्या सोडविण्यासंदर्भात ठेकेदाराकडील कर्मचारी रोजंदारीवर नेमले असून, त्यांच्याकडून वर्गीकरण करून घेतले जात असल्याचे जगताप म्हणाले. (प्रतिनिधी)कचरा वर्गीकरण निर्मितीच्या ठिकाणी होणे कायद्यानेच बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार, महापालिकेने उपाययोजना करून याची जनजागृती करणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून कचरा डोळ्याआड करण्याव्यतिरिक्त कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत आणि कर्मचाऱ्यांना बंधनकारक केले जाते. ही बाब चुकीची आहे. त्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. त्यात तोडगा न निघाल्यास न्यायालयात जाण्याची कामगार संघटनेची तयारी आहे.- उदय भट (अध्यक्ष, पुणे मनपा कामगार युनियन)