शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

शिक्षणातून भावनांचा विकास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:11 IST

पुणे : मोबाईलने लहान मुलांचे विश्व विस्कळीत केले आहे. गोष्टींच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या भावना निर्माण ...

पुणे : मोबाईलने लहान मुलांचे विश्व विस्कळीत केले आहे. गोष्टींच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या भावना निर्माण होतात. लहान मुलांना देण्यात येणाऱ्या शिक्षणातून भावनांचा, अंत:करणाचा विकास व्हायला हवा, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी व्यक्त केले.

प्रतिभा लष्करे लिखित ‘सुरस कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मित्रमंडळ कॉलनी जवळील महालक्ष्मी सभागृह येथे केले होते. यावेळी व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी लेखिका प्रतिभा लष्करे, तुषार लष्करे उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘लहान वयात ज्या गोष्टी लहान मुलांना सांगितल्या जातात. त्यातून अनेक भावना मुलांमध्ये रुजतात. मुले मोठी झाल्यावर या भावना कायम राहतात. त्यामुळे संस्काराची मुल्ये लहान वयात रुजणे आवश्यक आहे.’

चारुहास पंडीत म्हणाले, ‘आजकाल मोबाईल, लॅपटॉप या माध्यमातून गोष्टी ऐकायला आणि पहायला मिळतात. तो एक चांगला अनुभव असतो. परंतु, आई, बाबा आजी यांच्या तोंडून गोष्टी ऐकणे हा जीवंत अनुभव आहे. युट्यूबपेक्षा प्रत्यक्ष गोष्टी सांगण्यावर भर असायला हवा. मुलांसोबत संवाद ठेवायला हवा.

प्रतिभा लष्करे म्हणाल्या, मुलांना गोष्टी सांगताना, गोष्टी लिहून काढायचा विचार मनात आला आणि त्यातून सुरस कथा या पुस्तकाची निर्मिती झाली. पुस्तकामध्ये लहान मुलांसाठी विविध कथांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

तन्वी लष्करे आणि रोहीत चांदोरीकर यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळ : प्रतिभा लष्करे लिखित सुरस कथा या लहान मुलांकरीता लिखीत पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन मित्रमंडळ कॉलनी जवळील महालक्ष्मी सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी (डावीकडून) प्रतिभा लष्करे, चारुहास पंडीत, डॉ. अ. ल. देशमुख, तुषार लष्करे.