शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आप्तस्वकियांकडूनच महिलांना धोका

By admin | Updated: June 27, 2017 08:04 IST

‘‘रस्त्यांवरच्या बोचऱ्या नजरांचा सामना आम्ही करू शकतो; परंतु घरातील वासनांध नजरांचा सामना आम्ही कसा करायचा,’’ असा प्रश्न जेव्हा एक अल्पवयीन मुलगी

लक्ष्मण मोरे। लोकमत न्यूज नेटवर्क‘‘रस्त्यांवरच्या बोचऱ्या नजरांचा सामना आम्ही करू शकतो; परंतु घरातील वासनांध नजरांचा सामना आम्ही कसा करायचा,’’ असा प्रश्न जेव्हा एक अल्पवयीन मुलगी महिला पोलिसांना करते तेव्हा निरुत्तर होण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. महिला आणि मुली घरांमध्येही सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पोलीस दप्तरी वर्षाकाठी दाखल होणाऱ्या बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक आरोपी हे नातेवाईक, वडील व शेजारीच असल्याचे चित्र आहे. वासनेच्या आवेगात नात्यांचा होत चाललेला खून ही एक नवी सामाजिक समस्या पुढे येत आहे.शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी आणि आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्यामध्ये सामाजिक चळवळी रुजल्या आणि वाढल्या. विशेषत: महिला सक्षमीकरणाच्या चळवळी कायमच आघाडीवर राहिल्या. पुरोगामित्वाचा चेहरा असलेल्या या शहराच्या पोटात मात्र काही भीषण वास्तव लपलेलं पाहायला मिळतं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये वर्षाकाठी साधारणपणे बलात्काराचे ३०० च्याआसपास गुन्हे दाखल होतात; तर विनयभंगाचे ६०० च्या पुढे गुन्हे दाखल होतात. या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. शिक्षण आणि सामाजिक चळवळींचे केंद्र असलेल्या पुण्यामध्ये या घटना वाढणे चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी तीन वर्षांत अटक केलेल्या बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमधील अटक आरोपींमध्ये नातेवाईक, ओळखीचे आणि शेजारी यांचे प्रमाण अधिक असल्याचेही वास्तव समोर आले आहे. वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटना वाढत आहेत. ज्यांच्यावर विश्वास असतो तीच व्यक्ती अशी घृणास्पद कृत्ये करते त्या वेळी त्यांच्यासमोर कोणासमोर जाऊन ‘व्यक्त’ व्हायचे, हा मोठा प्रश्न असतो. पोलिसांकडे झालेल्या तक्रारींमुळे किमान काही घटना उजेडात येतात. मात्र दहशतीमुळे, समाजातील इभ्रतीच्या भीतीमुळे अशा कित्येक अत्याचारांना वाचाच फुटत नाही, हे गंभीर आहे. विशेषत: महिलाच या अत्याचारांमध्ये आणि त्या घटना दाबण्यामध्ये सहभागी असतात तेव्हा पोलिसांसमोरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. व्यसनाधीनता, ओळखीचा गैरफायदा, भावना उद्दीपित होणे यासोबतच सहजतेने उपलब्ध होत असलेल्या ‘पॉर्न मटेरियल’मुळेही हे प्रकार वाढत चालले आहेत. कौटुंबिक संस्कारांचा कमी होत चाललेला प्रभाव, नात्यांचे पावित्र्य जपण्यापेक्षा उपभोगवादी होत चाललेली वृत्ती या घटनांना कारणीभूत ठरत आहेत.अनेकदा बलात्कार आणि लैंगिक छळवणुकीच्या बळी ठरलेल्या महिला आणि मुलींना दादही मागता येत नाही. कुटुंबातील अन्य सदस्य दोषी नातेवाइकाला शिक्षा देण्याऐवजी पीडितेलाच शांत राहण्यासाठी दबाव टाकतात. कुटुंबाची इभ्रत आणि खोट्या प्रतिष्ठेपायी अनेक जणी दहशतीमुळे तक्रार द्यायला पुढेही येत नाहीत. बदलत्या काळात महिला स्वयंपूर्ण होत आहेत; परंतु त्यांच्यावरच्या अत्याचारांच्या संख्येत मात्र घट होताना दिसत नाही. प्रत्येक घरातील पुरुषी मानसिकता आणि स्त्री ही भोगाची वस्तू आहे, ही विचारसरणी बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.मुलाने स्वत:च्याच आईवर बलात्कार करून खून केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी वाकडमध्ये घडली होती, तर स्वत:च्या पोटच्या १६ वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार करून तिच्या चेहऱ्यावर चाकूने वार करणाऱ्या वडिलांसह शेजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नोकरीत बढतीसाठी स्वत:च्या मुलीला बॉससोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या वडील आणि आजी-आजोबांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, तर कोंढव्यातही एका वडिलांनी स्वत:च्याच तीन मुलींवर अनेक वर्षे बलात्कार केल्याचा प्रकारही समोर आला होता.ज्यांच्यासोबत अशा घटना घडलेल्या आहेत, त्या महिलांना समाजामध्ये उजळ माथ्याने फिरणे अवघड होऊन बसले आहे. एकवेळ त्यांच्याकडे समाज सहानुभूतीने पाहतो; परंतु कुटुंबातील अन्य पुरुष तसेच नातेवाइकांचा मात्र बघण्याचा दृष्टिकोन बदलतो़ क्वचितच त्यांना मानसिक आधार दिला जातो़ त्यापेक्षा सहानुभूती दाखवत जवळीक साधून या पीडित महिलांचे अधिकाधिक शोषण करण्याचेच प्रकार होत आहेत. सार्वजनिक ठिकाणांवर होणारी छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांकडून पथके तयार करण्यात आलेली आहेत. कामाच्या ठिकाणी होणारी छळवणूक रोखण्यासाठी ‘विशाखा’ समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. निर्भयासारखी प्रकरणे घडल्यानंतर त्याचा गाजावाजा होतो. परंतु घरामध्ये पालक, नातेवाइक आणि ओळखीच्यांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडणे पीडितेसाठी तेवढेसे सोपे नसते.नात्यांची वीण उसवतेय नात्यांची वीण घट्ट होण्याऐवजी वासनेच्या आवेगात उसवत चालली आहे. बाललैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्येही पालक आणि नातेवाइकांकडून सर्वाधिक लैंगिक अत्याचार केले जात असल्याची आकडेवारी आहे. पुरुषी वासनांधतेत कोवळ्या जिवांचाही विचार करू नये, ही समाजासाठी शरमेची बाब म्हणावीइतपत गंभीर आहे.मोबाईल फोनवर सहज उपलब्ध असलेले इंटरनेट आणि त्यावरील लाखो पोर्न साईट्स, रस्त्यावर सहज उपलब्ध होणाऱ्या पोर्न सीडी आणि अन्य साहित्यामुळे भावना उद्दीपित होत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर तर अनेक अश्लील व्हिडीओ क्लिप सहज उपलब्ध होताहेत.1भावना उद्दीपित झाल्यानंतर त्या आवेगात कधी नकळत, तर कधी जाणिवपूर्वक अशा घटना घडत आहेत. नात्यांच्या पावित्र्याला काळिमा फासणाऱ्या या घटना आहेत. पोलिसांकडील दाखल गुन्ह्यांची आणि त्यातील आरोपींच्या वर्गवारीची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. भविष्यामध्ये या घटना वाढत राहिल्या तर सामाजिक स्वास्थ्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.2बलात्काराच्या आणि विनयभंगाच्या खटल्यांमध्ये पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता होते. अनेकदा तपासातील त्रुटी आणि परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध न झाल्याने दोषारोप सिद्ध होत नाहीत. कायद्याच्या पळवाटांमुळेही पीडितेला न्याय मिळत नाही.